शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आयकर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 1:50 AM

नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतब्येत खराब तरीही कामावर हजर : संपर्कात आलेल्यांचा शोध

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात विभागातील किती अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक आले आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याची तब्येत तीन दिवसांपासून खराब होती. त्यानंतरही तो कामावर उपस्थित राहत होता. या तीन दिवसात वा त्यापूर्वी तो कुणाकुणाच्या संपर्कात आला आहे, याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी गोळा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार वा नाही किंवा सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती समजू शकली नाही. सूत्रांनी सांगितले की, प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असताना तसेच आयकर विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये बहुतांश कामे बंद असतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असते. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त पुणे, मुंबई आणि दिल्लीला विमानाने जातात. ते परत आल्यानंतर क्वारंटाईन होत नाहीत. ही बाब या कार्यालयात नेहमीचीच आहे. पूर्वीप्रमाणेच आयकर आयुक्तांचे (प्रशासन) कार्यालय सॅनिटाईझ्ड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.कर्मचाऱ्याची तब्येत तीन दिवसांपासून खराब असतानाही त्याला कामावर का बोलविण्यात येत होते, याची चौकशी करण्याची मागणी आयकर विभागाच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केवळ १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांना कामावर बोलवावे, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय