शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
5
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
6
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
8
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
9
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
10
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
11
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
12
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
13
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
14
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
15
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
16
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
17
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
18
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
19
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:45 IST

मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १५०५ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देएका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी पॉझिटिव्ह : ३३ रुग्णांची नोंदरामदासपेठेत पुन्हा एक रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १५०५ वर पोहचली आहे. रामदासपेठ येथून पुन्हा एक रुग्ण खासगी प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, आज मेयोमधून ७, एम्समधून १० तर मेडिकलमधून ४१ असे ५८ रुग्णांना सुटी देण्यात आली. मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्याची २५ जूनपासून प्रकृती खालावली होती. २७ जून रोजी कर्मचाऱ्याला मेडिकलमध्ये भरती केले. कर्मचाऱ्याची लक्षणे पाहत कोविड चाचणी केली, असता २८ जून रोजी पॉझिटिव्ह अहवाल आला. यामुळे कारागृह अधीक्षकांच्या विनंतीवरून २९ जून रोजी कारागृहातच नमुने घेण्याची सोय करण्यात आली. यात कारागृह अधीक्षकांसह, अधिकारी व कर्मचारी अशा ३० जणांनी आपले नमुने दिले. यात आज नऊ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यात एक पोलीस निरीक्षकासह शिपाई, हवालदार व कर्मचारी आहेत. तूर्तास तरी कुठल्याही कैद्याला कोविडची लागण झालेली नाही. विदर्भात आतापर्यंत केवळ अकोल्यात कैद्यांना कोविडची लागण झाली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक अनुपकुमार कुमरे म्हणाले, कारागृह हे गेल्या १ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशी वर्गवारी करून २१-२१ दिवसाचा कालावधी निश्चित करून व्यवस्थापन करण्यात आले होते. त्यानुसार २६ जून रोजी माझ्यासह २१ लोकांच्या टीमने कारागृहाचा चार्ज घेतला. पॉझिटिव्ह आलेल्यांकडून तूर्तास तरी कुठल्या कैद्याला लागण झालेली नाही. तरीही खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व कर्मचारी जेल क्वॉर्टरमध्ये राहतात. यामुळे त्यांच्या कुटुंबाना क्वारंटाईन करण्यात आले आहे.कामठी येथून पुन्हा आठ तर झिंगबाई टाकळी येथून एक रुग्णकामठी येथून आज पुन्हा आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कामठी शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे. यातील २० रुग्ण हॉस्पिटलमधील तर पाच सामान्य नागरिक आहेत. या शिवाय, मोमीनपुरा येथील पाच, मिनीमातानगर, टिमकी, झिंगाबाई टाकळी व रामटेक येथील प्रत्येकी एक रुग्ण पॅझिटिव्ह आला आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून नाईक तलाव-बांगलादेश येथील तीन रुग्ण, एम्सच्या प्रयोगशाळेतून नरखेड येथील एक तर खासगी प्रयोगशाळेतून रामदासपेठ येथील ४० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.५८ रुग्णांना डिस्चार्जमेयोतून अमरावती, एसआरपीएफ कॅम्प हिंगणा, कामठी, गणेशपेठ व वर्धा येथील एक अशा सात रुग्णांना सुटी देण्यात आली. मेडिकलमधून ४१ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात नाईक तलाव-बांगलादेश, लष्करीबाग, धंतोली, प्रेमनगर, खरबी, गणेशपेठ, चंद्रमणीनगर, इसासनी हिंगण रोड, त्रिमूर्तीनगर, पाचपावली येथील रुग्ण आहेत. एम्समधून १० रुग्णांना सुटी देण्यात आली. एकूण ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. १२३२ रुग्ण बरे झाले आहेत.संशयित : १७८५अहवाल प्राप्त : २४५००बाधित रुग्ण : १५०५घरी सोडलेले : १२३२मृत्यू : २५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याjailतुरुंगnagpurनागपूर