शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

कोरोना इफेक्ट : रेस्टॉरंट चालकांची स्थिती ‘अर्श से फर्श तक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:31 PM

फूड सर्व्हिस सेक्टर हे जगातील सर्वात मोठे उलाढालीचे क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रचंड घरघर लागली असून, गेल्या सहा महिन्यात या क्षेत्राने ‘अर्श से फर्श तक’ असा प्रवास केला आहे.

ठळक मुद्दे फूड सर्व्हिस सेक्टरचे झाले वाटोळेअनेकांनी साहित्य काढले विक्रीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फूड सर्व्हिस सेक्टर हे जगातील सर्वात मोठे उलाढालीचे क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रचंड घरघर लागली असून, गेल्या सहा महिन्यात या क्षेत्राने ‘अर्श से फर्श तक’ असा प्रवास केला आहे.दररोज हजारो-लाखो रुपयांचे काऊंटर असलेले हे सेक्टर अचानक मातीत मिळाल्यासारखे झाले आहे. कोरोनामुळे नागपुरातील लहानापासून ते मोठ्या रेस्टेराँची स्थिती एकसारखीच आहे. शहरात हजारो लहान-मोठे रेस्टेराँ, बार रेस्टेराँ, ढाबे आहेत आणि लॉकडाऊनपूर्वी या सर्व रेस्टेराँची एका दिवसाची उलाढाल शेकडो कोटी रुपयांची होती. टाळेबंदी शिथिल झाल्यावरही ग्राहकी नसल्याने शहरातील ७० टक्के रेस्टेराँ बंद पडले आहेत. ग्राहक नाही, उत्पन्न नाही, जागेचे भाडे देणे थांबले नाही, विजेचे बिल सुरूच होते याचा परिणाम विना उत्पन्न दरमहा लाखो रुपये भाडे कसे द्यावे, असा प्रश्न या रेस्टेराँ, ढाबे मालकांना पडला. त्यामुळे, त्यांनी रेस्टेराँ बंद करून साहित्याची विक्री मिळेल त्या भावात करणे सुरू केले आहे.वेटर्सही झाले बेरोजगारउत्पन्नच नाही तर ग्राहकांना सेवा पुरविणारे वेटर्स कसे पोसावे, हा प्रश्न रेस्टेराँ मालकांना पडला. सुरुवातीचे दोन महिने कसेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनाही नोकरीवरून काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. प्रत्येक रेस्टेराँमध्ये प्रमुख स्वयंपाकी, त्याचा सहकारी आणि इतर सरासरी पाच वेटर्स आज बेरोजगार झाले आहेत. रेस्टेराँ मालक तर स्वत: कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याची स्थिती आहे.सप्टेंबरमध्ये सुरू, आता नाईलाजाने बंद केले - निपाणेपडोळे चौकात मागिल वर्षी सप्टेंबरमध्ये जोराशोरात रेस्टेराँ सुरू केले. महिन्याभरानंतर रेस्टेराँमध्ये ग्राहकी वाढली. अचानक १८ मार्च रोजी टाळेबंदीची नोटीस धडकली. टाळेबंदी उठेल आणि रेस्टेराँ सुरू करू, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा पूर्णत: फोल ठरली. जागेचे भाडे, विजेचे भाडे, नोकरांचा पगार अशक्य झाला आणि अखेर बंद करावे लागले. आता साहित्याची विक्री करून, गुंतवणूक काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना युवा इन्टरप्रेन्योर अभिनव निपाणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल