शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कोरोना इफेक्ट; वैफल्यग्रस्तता अन् रोष वाढला; कुणावरही निघतो आहे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:57 IST

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे.

ठळक मुद्देकोरोनाने मोकळेपणाने जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतल्यासारखे झाले आहे. त्यामुळे सामाजिक नैराश्य आले आहे. व्यक्त होण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे कुणाकडचा राग कुणावर निघत आहे. त्याचमुळे घात, आत्मघातकी प्रकार वाढले आहेत. ---राजा आकाश  समुपदेशक, नागपूर.

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक महामारीच्या रूपात आलेल्या कोरोनाच्या प्रकोपाचे भयावह सामाजिक दुष्परिणाम सर्वत्र उमटू लागले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे.

पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला घरगुती कारणावरून बोलल्यामुळे आत्महत्या केल्याच्या अनेक घटना गेल्या तीन आठवड्यात नागपुरात घडल्या आहेत. या घटनांची पार्श्वभूमी जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कोरोनामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लाखो जणांची तीव्र आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. परिणामी सर्वत्र चिडचीड, वाद वाढले आहेत. भावनिक आगडोंब उसळत असल्याने छोट्या छोट्या कारणावरून कुणी कुणाचा जीव घेत आहे तर कुणी स्वत:चा जीव देत आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नागपुरात गेल्या तीन महिन्यात ११५ जणांनी आत्महत्या केली. यात नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि सर्वच स्तरातील व्यक्ती, तरुण, तरुणीचा समावेश आहे. यातील ७० आत्महत्येच्या घटना या आर्थिक कोंडी अन् त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तसेच चिडचिडेपणामुळे झाल्या आहेत. दुसरीकडे किरकोळ कारणावरून एकमेकांची हत्या केल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे जगण्यावर बंधने आली आहेत. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, मनासारखे खाणे, घेणे बंद झाले आहे. एवढेच नव्हे तर कुठे जाता येत नाही. अर्थात, मोकळेपणाने फिरणेही बंद झाले आहे. या एकूणच प्रकारामुळे अनेकांना प्रचंड नैराश्य आले असून त्यातून आक्रित घडत आहे. खालील काही घटनांवरून त्याची प्रचिती यावी.

नंदनवन परिसरात बुधवारी रात्री अगदीच किरकोळ कारणामुळे आरोपी बंडू टापरेने शेजारच्या आरती नितीन गिरडकर नामक महिलेची भीषण हत्या केली. या आरोपीचा कोणताही गुन्हेगारी अहवाल नाही.मंगळवारी २३ जूनला धंतोलीत एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला झोपेत तोंडावर हात पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.स्वत:चे व्यापारी संकुल असलेल्या पारडीतील मेहर नामक व्यापारी बंधूंनी ७ जूनला दारूच्या नशेत गुन्हेगार दुकानासमोरून हटत नसल्याने त्याचा मुडदा पाडला. लकडगंजमध्ये पुरी खायला दिली नाही म्हणून रोजमजुरी करणाऱ्या  एकाने दोन मजुरांची हत्या केली.पत्नी आधीसारखी लक्ष देत नसल्यामुळे ३० मे रोजी पोलीस महिलेच्या पतीने तहसीलमध्ये आत्महत्या केली.फेसबुकवर चॅटिंग करताना हमरीतुमरीवर आलेल्या दोघांनी ५ जूनला एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला.पुण्यात एमआयटीत शिकणाऱ्या धंतोलीतील एका सुखवस्तू कुटुंबातील आणि घरात लाडकी असलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.आर्थिक कोंडी झाल्याने सदरमध्ये केटरिंग व्यावसायिकाने २१ जूनला आत्महत्या केली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस