शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

कोरोनाचा परिणाम : एक महिन्यासाठी कोळसा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:33 PM

वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे  एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल.

ठळक मुद्देवेकोलिने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे  एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल. वेकोलिने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे.वेकोलिने नोव्हेंबर २०१९ मध्ये आपल्या ६६ पैकी ११ खदानी वीज केंद्रासाठी आरक्षित केल्या होत्या. यात दिनेश, मकरधोकडा-१, गोकुल, भानेगाव, सिंगोरी, पेनगंगा, एकोना, पवनी -२ व ३, मुंगोली, नीलजई आणि गोंडेगाव खदानींचा समावेश आहे. यापूर्वी वीज केंद्रे पूर्ण भारतातील कोळसा खदानीमधून कोळसा घेत होते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च अधिक येत होता. परंतु वेकोलिच्या या खदानींमधून कोळसा घेत असल्याने वीज केंद्रांचे एका टनामागे हजार रुपये वाचत आहेत. या मोबदल्यात वीज केंद्रांकडून अधिसूचित दरापेक्षा ४५० रुपये अतिरिक्त देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटकातील राज्य विद्युत केंद्र आणि इतर खासगी वीज केंद्र या ११ खदानींमधून अ‍ॅड ऑन किमतीवर कोळसा घेत आहे. स्पेशल फॉरवर्ड ई-ऑक्शन अंतर्गत या कोळशाचा लिलाव होतो. आता या खदानींमधील स्पेशल फॉरवर्ड तथा स्पॉट ई-ऑक्शनच्या दरामध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे.

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरelectricityवीज