विदर्भात ६,७२७ पॉझिटिव्ह, ५९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 07:00 IST2021-03-22T07:00:00+5:302021-03-22T07:00:02+5:30
Nagpur news विदर्भात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन बाधितांची संख्या ६ हजारांवर गेली.

विदर्भात ६,७२७ पॉझिटिव्ह, ५९ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन बाधितांची संख्या ६ हजारांवर गेली. रविवारी ६,७२७ रुग्ण व ५९ मृत्यूची नोंद झाली. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे तर सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. ३,६१४ रुग्ण व ३२ रुग्णांचे बळी गेले.
बुलडाण्यात दैनंदिन बाधित रुग्णांचे जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम स्थापन होत आहेत. रविवारी ८०२ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना अचानक मृत्यूच्या संख्येने दोन अंकी आकडा गाठला. १४ रुग्णांचा मृत्यू झाला तर ३८२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अकोल्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढून ५४३ झाली.
अमरावतीमध्ये ४५७ रुग्ण व ६ मृत्यू, वाशिममध्ये २६९ रुग्ण व १ मृत्यू, चंद्रपूरमध्ये २१५ रुग्ण व २ मृत्यू, वर्धेत १९८ रुग्ण व २ मृत्यू तर भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशी शंभर रुग्णांचा टप्पा गाठत रुग्णसंख्या १२३ झाली.
जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू
नागपूर : ३६१४ : १९३०८० : ३२
गोंदिया : ९२ : १५०८७ : ००
भंडारा : १२३ : १५०९२ : ०१
चंद्रपूर : २१५ : २५७३३: ०२
वर्धा : १९८ : १६५६३ : ०२
गडचिरोली : ३२ : १०१४१ : ००
अमरावती : ४५७ : ४५३९५ : ०६
यवतमाळ : ३८२ : २४५९३: १४
वाशिम : २६९ : १२८५८ : ०१
बुलडाणा : ८०२ : ३०१०७ : ०१
अकोला : ५४३ : २४४०९ : ००