शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा

By कमलेश वानखेडे | Updated: June 26, 2024 18:58 IST

Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस लांबल्याने काळजीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन समन्वयासाठी तत्पर रहा. याचबरोबर त्यांच्या पुढील नियोजन व सेवासुविधेसाठी योग्य ती काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. 

शेतकऱ्यांच्या बांधापासून बी-बियाणे, खत विक्रेत्यांसमवेत ग्रामीण पातळीपासून सबंधित कृषी व महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयातून कर्तव्य पार पाडावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील अनेक भागात झालेली पेरणी, लाबंलेला पाऊस, उपलब्ध पाणीसाठा, बियाणे व खते यांचा पुरवठा याबाबत तपशिलवार माहिती घेतली.  पेरणीनंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खतांचे व्यवस्थापन करावे लागते. जिल्ह्यातील जमिनीचा पोत, शेतकऱ्यांच्या शेतातील नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) बाबतचे प्रमाण लक्षात घेऊन खताची मात्रा ठरविण्यात येते. तथापि अनेक गावात शेतकऱ्यांना जे खत हवे आहेत त्याचा पुरवठा न करता त्यांना इतर खताशी लिकींग करुन फसविले जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जर शेतकरी बी-बियाणे, खते, किटकनाशके याबाबत फसविला गेला तर जिवानाश्यक वस्तू कायदा अधिनियम व फर्टीलायझर ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिला. 

खते, बियाणे, निविष्ठा याबाबतचा आढावा विविध बँकांच्या प्रतिनिधीसमवेत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी घेतला. या बैठकीस इफको, कोरोमंडल, सीआयएल, कृभको, नर्मदा, पीपीएल, आरसीएफ आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह येथे आज सकाळी बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहारे व विविध

डीलरचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी सावनेर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या समवेत सावनेर येथे पंचायत समिती सभागृह येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पीक विमा, ई-पिक पाहणी, एनएलआरएमपी, पांदण रस्ते, थकीत करमणूक व कर वसुली, कृषी-पीक विमा आदी बाबत निधीचे वाटप, घरकुल योजना, जलजीवण मिशन कार्यक्रम, जलयुक्त शिवार आदीबाबत आढावा घेतला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfarmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रnagpurनागपूर