नासुप्र कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय
By गणेश हुड | Updated: March 27, 2024 14:52 IST2024-03-27T14:52:44+5:302024-03-27T14:52:57+5:30
सहकार पॅनलचे सर्व ११ सदस्य बहुमतांनी निवडून आले.

नासुप्र कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. संस्थेच्या ग्रेट नाग रोड येथील सभागृहात शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहकार पॅनलचे सर्व ११ सदस्य बहुमतांनी निवडून आले.
नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून दिलीप हटवार, उपाध्यक्ष मनोहर पाटील, सचिव राजन परकाळे, सहसचिव-हरिश्चंद्र मेश्राम, कोषाध्यक्ष राजेश काथवटे, महिला सदस्य जागृती कापगते (झोडे) व सदस्य म्हणून सारनाथ गेडाम, राजेश काठोळे, प्रमोद गोस्वामी, लोभेश बोबडे ,सतीश भूरले आदींचा समावेश आहे. विजयानंतर सहकार पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.