स्वयंपाकी, मदतनीसांना दोन महिन्यापासून वेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:21+5:302021-01-13T04:17:21+5:30
जिल्ह्यात २,८१८ वर शाळा असून, येथे जवळपास ४,५०० वर स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. हा आहार शिजविण्यासाठी या स्वयंपाकी ...

स्वयंपाकी, मदतनीसांना दोन महिन्यापासून वेतनाची प्रतीक्षा
जिल्ह्यात २,८१८ वर शाळा असून, येथे जवळपास ४,५०० वर स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. हा आहार शिजविण्यासाठी या स्वयंपाकी व मदतनीसांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करार पद्धतीने कामावर ठेवण्यात येते. त्यानुसार त्यांना १५०० च्यावर मानधनही देण्यात येते. यासाठी दर महिन्याला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जवळपास ६२ लाखावरचा निधी या स्वयंपाकी व मदतनीसांच्या वेतनासाठी लागतो. नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यापासून त्यांचे वेतनच झालेले नाही. शासनाकडून त्यांच्या वेतनासाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. जि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाकडून या स्वयंपाकी व मदतनीसाच्या वेतनासाठी शासनाकडे एक कोटीवरील निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सूत्राच्या माहितीनुसार अद्यापपर्यंत शासनाकडून हा निधी उपलब्ध झालेला नसल्याची माहिती आहे.