नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कूकची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:33 IST2020-06-12T19:30:09+5:302020-06-12T19:33:17+5:30
ग्रामीण पोलीस मुख्यालयातील मेसमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कूकची गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयातील मेसमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
राजू गणपतराव निकोसे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण पोलीस मुख्यालयात बिल्डिंग नंबर सातमध्ये राजू निकोसे राहत होते. ते पोलिस मुख्यालयातील मेसमध्ये कूक म्हणून काम करायचे. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांनी गळफास लावून घेतला. ते दिसताच त्यांचा मुलगा कुणाल राजू निकोसे याने वडिलांना तातडीने त्याला खाली उतरवून मेयो इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी निकोसे यांना मृत घोषित केले. कुणाल निकोसे यांच्या तक्रारीवरून कपिल नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजू निकोसे यांची मानसिक अवस्था बिघडल्यामुळे ते असामान्य वर्तन करत होते. घरच्यांनी त्यांची वेगळ्या पद्धतीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फायदा झाला नाही. प्रचंड नैराश्य आल्यामुळे राजू निकोसे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पुढील तपास सुरू आहे.