विद्यापीठाचा २६ रोजी दीक्षांत समारंभ
By Admin | Updated: September 7, 2014 00:51 IST2014-09-07T00:51:40+5:302014-09-07T00:51:40+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने येत्या २६ सप्टेंबर रोजी १०० व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण

विद्यापीठाचा २६ रोजी दीक्षांत समारंभ
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने येत्या २६ सप्टेंबर रोजी १०० व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण परिसरातील क्रीडांगणावर हा समारंभ होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येईल.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार राहणार असून, व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहतील.
विशेष म्हणजे, विद्यापीठाला गतवर्षी ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. तेव्हापासून विद्यापीठातील हजारो विद्यार्थी या समारंभाची प्रतीक्षा करीत होते. शेवटी विद्यापीठ प्रशासनाने कुलपती कार्यालयाची परवानगी प्राप्त करून, २६ सप्टेंबर रोजी हा समारंभ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कळविण्यात आले आहे.