शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील कोळशाचे रूपांतर 'वायू'त, 'सिंथेटिक नॅचरल गॅस'कडे महाझेप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:53 IST

Nagpur : विदर्भाच्या मातीत दडलेले 'काळे सोने' आता नव्या ऊर्जा क्रांतीचे रूप धारण करीत आहे. अत्याधुनिक 'कोल गॅसिफिकेशन' तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कोळसा ज्वलनापलीकडे जाऊन स्वच्छ, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक इंधननिर्मितीचा नवा अध्याय येथे सुरू झाला आहे.

बालाजी देवर्जनकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या मातीत दडलेले 'काळे सोने' आता नव्या ऊर्जा क्रांतीचे रूप धारण करीत आहे. अत्याधुनिक 'कोल गॅसिफिकेशन' तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कोळसा ज्वलनापलीकडे जाऊन स्वच्छ, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक इंधननिर्मितीचा नवा अध्याय येथे सुरू झाला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या पुढाकारातून उभारले जाणारे पाच महाप्रकल्प आणि त्यातून होणारे वार्षिक १७.०४ दशलक्ष टन 'सिंथेटिक नॅचरल गॅस' उत्पादन विदर्भाच्या औद्योगिक क्षितिजाला नवी झेप देणार आहे. ऊर्जा-सुरक्षेच्या राष्ट्रीय समीकरणात विदर्भ भविष्यात केवळ खनिजांचा प्रदेश राहणार नाही, तर भारताच्या 'नेट झीरो' ध्येयाचा भक्कम ऊर्जा-कणा म्हणून उदयास येणार आहे.

या संपूर्ण उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प, माजरी क्षेत्रातील जुन्या कुनाडा खाणीत कोल इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियमच्या संयुक्त प्रयत्नांतून आधुनिक प्रकल्प साकारले जात आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत या संयुक्त कंपनीची स्थापना होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रक्रियेत कोळशाचे थेट ज्वलन न करता त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे वायूमध्ये रूपांतर केले जाईल. या प्रक्रियेतून तयार होणारा 'सिंथेटिक नॅचरल गॅस' (एसएनजी) हा नैसर्गिक वायूला (पीएनजी) एक सक्षम आणि किफायतशीर पर्याय ठरेल. या उपक्रमासाठी टाकळी जेना, निलगाव, एकात्मिक उकनी-पिंपळगाव विस्तार, सावनेर-३ आणि निलजई विस्तार या पाच प्रमुख प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

सौरऊर्जेचा पूरक आराखडा

  • गॅसिफिकेशन प्रकल्पांना पूरक म्हणून 'डब्ल्यूसीएल'ने नूतनीकरणक्षम ऊर्जेचा मोठा आराखडा तयार केला आहे. विशेषतः सौरऊर्जेवर भर देत विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे.
  • जामुनिया भूमिगत खाणीतील १५ मेगावॅटचा सौर प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, तसेच कन्हानमधील नंदन वॉशरी येथे ७० मेगावॅट, चंद्रपूरमधील दुर्गापूर येथे ५ मेगावॅट आणि माजरी क्षेत्रात २३ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले जात आहेत.
  • या सौर प्रकल्पांमुळे कंपनीची पारंपरिक विजेवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भविष्यात कंपनी ऊर्जानिर्मितीत आत्मनिर्भर होण्याचा मार्ग यामुळे मोकळा होईल.

 

गॅसिफिकेशन ते सौरऊर्जा : विदर्भाच्या विकासाचा नवा मार्ग

  • कोळशाच्या गॅसिफिकेशन प्रक्रियेतून तयार होणारे स्वच्छ व कार्यक्षम इंधन.
  • उष्मांक क्षमता नैसर्गिक वायुसमान, त्यामुळे औद्योगिक वापरासाठी उपयुक्त.
  • पारंपरिक कोळसा ज्वलनाच्या तुलनेत कार्बन व सल्फर उत्सर्जन कमी.
  • आयातीत नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व घट, स्वदेशी पर्याय उपलब्ध.
  • ऊर्जा आयातीवरील खर्च कमी, परकीय चलनाची बचत.
  • पाइपलाइनद्वारे पुरवठ्यामुळे वाहतूक खर्चात सुमारे ८० टक्के घट.
  • सौरऊर्जेमुळे विदर्भात स्वच्छ व स्थिर ऊर्जा उपलब्धता वाढ.
  • उत्पादित सौरऊर्जा ग्रीडमध्ये समाविष्ट केल्यास कृषी व लघुउद्योगांना दिवसा स्थिर वीजपुरवठा.
  • कोळसा खाणींच्या ओसाड जमिनींचा सौर पार्कसाठी उपयोग.

 

हे प्रकल्प औद्योगिक वाढ आणि शाश्वत विकासाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भविष्यात हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा उत्पादनाशी स्पर्धा करणारा ठरू शकतो. एवढ्या प्रमाणातील गॅसचा वापर वीजनिर्मिती, खत उद्योग, रसायन उद्योग आणि औद्योगिक इंधन म्हणून होऊ शकतो. त्यामुळे कोळशावर आधारित पारंपरिक वीजनिर्मितीवरचा ताणही कमी होण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Coal Transformation: Leaping to Synthetic Natural Gas Production

Web Summary : Vidarbha transforms coal into synthetic natural gas via advanced technology. Five projects will produce 17.04 million tons annually, boosting industry and energy security. Solar energy integration further promotes sustainability and reduces reliance on traditional power sources, paving the way for a greener future.
टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ