शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
4
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
5
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
6
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
7
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
8
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
9
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
10
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
11
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
12
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
13
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
14
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
15
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
16
'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले
17
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
18
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
19
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
20
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही

कोरोनाग्रस्त वन विभागावर अधिवेशनाचेही ‘टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 22:11 IST

येथील वन भवनातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. असे असले तरी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचा ताण वन भवनावर दिसून आला. मंत्रालयाला कोणत्याही क्षणी कोणत्याही माहितीची गरज पडू शकते, यामुळे या गंभीर परिस्थितीतही कर्मचारी अधिकारी सेवा देताना दिसले.

ठळक मुद्दे कर्मचारी सेवेत तत्पर : वन भवनात प्रवेशच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील वन भवनातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. असे असले तरी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचा ताण वन भवनावर दिसून आला. मंत्रालयाला कोणत्याही क्षणी कोणत्याही माहितीची गरज पडू शकते, यामुळे या गंभीर परिस्थितीतही कर्मचारी अधिकारी सेवा देताना दिसले.सुरूवातीच्या काळामध्ये येथील वित्त विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जनसंपर्क विभागातही कोरोनाने शिरकाव केला होता. नंतरच्या काळात एका गार्डला लागण होऊन त्याचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर सात कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले होते.वनभवनामध्ये दक्षतेच्या कारणावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अनेक अधिकारी आणि कर्मचारी अलिकडच्या काळात पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या २७ च्या जवळपास असल्याचे सांगण्यात येते. मुंबईमधील अल्प कालावधीच्या अधिवेशनासाठी स्टॉफला अधिक प्रमाणात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अधिवेशन असल्याने कोरोनाचा ताण बाजूला सारून येथे उपस्थिती दिसली. यावर अनेकांची नाराजी असली तरी, नाईलाज असल्याने यावे लागते, अशी बोलकी प्रतिक्रिया उमटत आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षितता बाळगून काम करा, असा सल्लाही देण्यात आला आहे.दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी कार्यालय रोज सॅनिटाईज केले जात आहे, टपालही बाहेरूनच स्वीकारले जात असून निर्जंतुक करूनच संबंधितांकडे पोहचविले जात आहे. वन भवनात कुणालाही प्रवेश दिला जात नसून येथील अहवाल वनमंत्रालयाला पाठविला जात आहे. अधिवेशन संपल्याने आता येथील स्टॉफचा ताणही हलका झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागVidhan Bhavanविधान भवनEmployeeकर्मचारी