तब्बल २८ दिवस चालले अधिवेशन
By Admin | Updated: December 3, 2015 03:42 IST2015-12-03T03:42:33+5:302015-12-03T03:42:33+5:30
नागपुरातील हिवाळी अधिवेशन म्हटले की, ते किती दिवस चालेल याचीच सर्वाधिक चर्चा होत असते. १९६० सालापासून नागपुरात होणाऱ्या हिवाळी

तब्बल २८ दिवस चालले अधिवेशन
मागोवा नागपूर अधिवेशनाचा : १९६८ मध्ये विधानसभेत रेकॉर्ड १४६.०७ तास झाले काम
आनंद डेकाटे नागपूर
नागपुरातील हिवाळी अधिवेशन म्हटले की, ते किती दिवस चालेल याचीच सर्वाधिक चर्चा होत असते. १९६० सालापासून नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आढावा घेतला असता १९६८ साली विधानसभेचे कामकाज तब्बल २८ दिवस चालले. तेव्हा १४६.०७ तास काम झाले होतो. तो रेकॉर्ड अजूनही मोडलेला नाही, हे विशेष.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नागपुरातील पहिले आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे दुसरे अधिवेशन १९६० साली नागपुरात १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालवधीत भरविण्यात आले होते. तेव्हा विधानसभेच्या २७ बैठका झाल्या आणि १३६.५० तास कामकाज झाले होते. त्यानंतर १९६१ मध्ये २५ दिवस (१२३.१२ तास कामकाज), १९६४ मध्ये २३ दिवस, ११२.२६ तास कामकाज, १९६५ मध्ये १५ दिवस ७९.०१ तास कामकाज, १९६६ मध्ये २४ दिवस १०८.०२ तास कामकाज झाले. १९६७ मध्ये १७ दिवस, ७६.५६ तास कामकाज, १९६८ मध्ये २८ दिवस, १४६.०७ तास कामकाज, १९६९ मध्ये २४ दिवस (१२०.४५ तास), १९७० मध्ये १८ दिवस (७६.१० तास), १९७१ मध्ये २६ दिवस (१३४.१२ तास), १९७२ मध्ये २० दिवस ९४.५७ तास, १९७३ मध्ये २५ दिवस १२९.४६ तास, १९७४ मध्ये २५ दिवस १३६.०१ तास, १९७५ मध्ये १७ दिवस ८९.५८ तास, १९७६ मध्ये १५ दिवस ७७.०१ तास, १९७७ मध्ये १४ दिवस ८१.१४ तास, १९७८ मध्ये १४ दिवस ६७.३९ तास, १९८१ मध्ये १५ दिवस ७७.३४ तास कामकाज, १९८२ मध्ये १० दिवस ६३.४९ तास कामकाज झाले.
१९८३ मध्ये १५ दिवस ९९.१० तास, १९८६ मध्ये १५ दिवस १०१.५२ तास, १९७८ मध्ये १५ दिवस ९७.२३ तास, १९८८ मध्ये ९९.२३ तास, १९९० मध्ये १४ दिवस ९४.१५ तास, १९९१ मधये १४ दिवस ६८.१५ तास, १९९३ मध्ये १४ दिवस ९२.०४ तास, १९९५ मध्ये १४ दिवस ६५.२४ तास, १९९६ मध्ये १० दिवस ७०.०३ तास, १९९८ मध्ये १२ दिवस ७१.२३ तास, १९९९ मध्ये १० दिवस ७२.२८ तास, २००० मध्ये १५ दिवस १०८.३४ तास काम, २००१ मध्ये १० दिवस ४५ तास काम, २००३ मध्ये १० दिवस ६३.३३ तास, २००४ मध्ये ११ दिवस ८६,०२ तास, २००५ मध्ये १० दिवस ६८.३६ तास, २००६ मध्ये १० दिवस ७४.५१ तास, २००७ मध्ये ११ दिवस ७८.२३ तास, २००८ मध्ये १२ दिवस १०९.४३ तास, २००९ मध्ये १० दिवस ८५.०८ तास, २०१० मध्ये १२ दिवस १०४ तास, २०११ मध्ये ११ दिवस ६५ तास, २०१२ मध्ये १० दिवस ६२.४८ तास २०१३ मध्ये १० दिवस ६४ तास आणि गेल्यावर्षी २०१४ मध्ये १३ दिवस आणि ८५.८ तास विधानसभेचे कामकाज चालले. त्यामुळे १९६८ साली झालेल्या कामकाजाचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे.