शेतकरी कर्जमाफीसाठी ई-सेवा सेतू केंद्रात सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST2017-08-24T00:36:00+5:302017-08-24T00:36:34+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी ई-सेवा सेतू केंद्रात सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे. त्यासाठी सर्व ई-सुविधा केंद्रामध्ये तसेच सेतू केंद्रामध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शनिवारपासून तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय येथे विशेष आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज करणाºयांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे सर्व शेतकरी खातेदारांनी हे भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
या शिबिरात जाऊन शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज करावे. यासोबतच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ७२ शाखांमध्येही अर्ज भरता येतील.
ही नोंदणी करताना अर्जदार व पती-पत्नीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणीसाठी महा ई-सेवाकेंद्र, सुविधा केंद्र, तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७२ शाखांसह तहसील कार्यालय, तसेच मंडळ कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन कर्जमाफी योजनेत सहभाग घ्यावा. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, तसेच कृषी विकास अधिकारी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी साहाय्य करणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करणार आहेत.
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शेतकºयांना लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक संपूर्ण मदत करणार आहे. त्यानुसार शेतकºयांनी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी १५ सप्टेंबरपूर्वी आॅनलाईन अर्ज सादर करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
आतापर्यंत १४ हजारावर शेतकºयांचे अर्ज
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने १ एप्रिल २००९ नंतरचे वाटप झालेले मात्र ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार असून, दीड लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्जाची रक्कम भरणा केल्यास शासनाकडून दीड लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे २६ हजार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २४ हजार अशा सुमारे ५० हजार शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी कर्जमाफी मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.