विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टवरून बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:15+5:302021-04-19T04:07:15+5:30
नागपूर : डाॅ. बाबासाहब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गेटवर आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या पथकासोबत एका अधिकाऱ्याची ...

विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टवरून बाचाबाची
नागपूर : डाॅ. बाबासाहब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गेटवर आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या पथकासोबत एका अधिकाऱ्याची बाचाबाची झाली. घटनेची सूचना मिळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु तिथे तक्रारकर्ता अधिकारी न मिळाल्याने पोलीस माघारी परतले.
विमानतळ सूत्रांनुसार, शनिवारी रात्री १०.३० वाजता दिल्लीवरून नागपूरला विमान पोहोचले. विमानातून शासनाचा एक उच्च अधिकारी जेव्हा आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या पथकाजवळ पोहोचले. तेव्हा तिथे उपस्थित कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याजवळ येऊन असे काहीतरी सांगितले की, त्या अधिकाऱ्याला ती आवडली नाही. त्यांनी लगेच पोलिसांना सूचित केले. यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यातून एक पीएसआयसह पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत तक्रारकर्ते अधिकारी निघून गेले होते. पोलीस आले तेव्हा त्यांना तक्रारकर्ता अधिकारीच मिळाला नाही. त्यामुळे पोलीसही परत गेले. पोलीस सूत्रानुसार, पोलिसांनी येथे आरटीपीसीआर सेंटरवरील काही लोकांची विचारपूस केली तेव्हा त्यांना नेमके घडले काय हे स्पष्टपणे समजू शकले नाही. सूत्रानुसार, टेस्ट रिपोर्ट नसल्यामुळे काही देवाण-घेवाणवरून बाचाबाची झाली असल्याची सांगितले जाते.