शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 14:57 IST

मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नागपूर : मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मतमोजणीच्या वेळी त्यांना देण्यात आलेले मशिनचे क्रमांक आणि प्रत्यक्ष मोजणी होत असलेल्या मशिनचे क्रमांक यात तफावत होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यावरून वादावादी झाली. उमेदवार नाना पटोले हे मध्ये पडले. वाद जिल्हाधिका-यांपर्यंत गेला. त्यांच्यातही वाद झाला. मतमोजणी करताना बंद पडलेल्या मशिन्स प्रतिनिधींसमोर दुरुस्त न करता त्या दुसरीकडे नेऊन चालू केल्या आणि त्यातील निकाल प्रतिनिधींना दाखविले, असा आरोप केल्याने त्यांच्यात वाद झाला.  तसेच पूर्व नागपूर मतदारसंघाची मतमोजणी जिथे सुरू होती, त्या ठिकाणी जेव्हा कुठल्या मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मोजायचे यासाठी चिठ्ठया टाकल्या जात होत्या. त्या व्यवस्थित टाकल्या जात नव्हत्या. त्याला पूर्व नागपुरातील काँग्रेसचे प्रतिनिधी अभिजित वंजारी यांनी आक्षेप घेतला. तेव्हाही वाद झाला. तुम्ही कुठल्याही सूचना करू नका. तुम्हाला काही अधिकार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले यावरून तो वाद पेटला.  

व्हिडीओतील सगळ्यांवर कारवाई यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'ईव्हीएमवर आक्षेप घेणे, निवडणुकीच्या कामात अडथळा आणणे, घोषणा देणे, असे प्रकार केल्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. २३ तारखेच्या रात्रीलाच तक्रार केली आहे. गोंधळाचा व्हिडीओ आम्ही तपासत असून, त्यात जे जे दिसतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल.'

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूर