शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसमधील वादावर पडदा, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मोरे यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:47 IST

गटबाजी संपविण्यावर भर : कुणाल राऊत यांचा कार्यकाळ झाला होता पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक काँग्रेसमध्ये उफाळलेल्या गटबाजीवर उपाय म्हणून शिवराज मोरे यांच्या हाती युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी या संबंधीची घोषणा शुक्रवारी केली. मावळते अध्यक्ष कुणाल राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राऊत यांची प्रदेश कार्यकारिणीत महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळीच युवक काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, याचे संकेत मिळाले होते.

कराड (सातारा जिल्हा) येथील शिवराज मोरे यांनी एनएसयूआयच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. २०१० ते २०१४ या काळात ते एनएसयूआय महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत, नतर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविली होती. कुणाल राऊत यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात युवक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. गटबाजीतून ६० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी निलंबित पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली होती. शेवटी शिवराज मोरे यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक करून असंतुष्ट गटाला आधार देण्यात आला होता. कुणाल राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. पण, सततच्या गटबाजीमुळे शेवटी राऊत यांना पदमुक्त करीत प्रदेश काँग्रेसमध्ये महासचिव नेमण्यात आले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करीत गटबाजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

कार्यकारिणीतही लवकरच फेरबदलयुवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर लवकरच कार्यकारिणीतही फेरबदल केला जाणार आहे. नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरे यांना पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. पक्षाचे राज्यातील नेते व युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून नवी कार्यकारिणी तयार केली जाणार आहे.

निवडणूक पद्धत बंद झाली का ?यापूर्वी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी निवडण्यासाठी राज्यभर निवडणूक घेण्यात आली होती. कुणाल राऊत हे सर्वाधिक मते घेत प्रदेशाध्यक्ष झाले होते. मात्र, आता शिवराज मोरे यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पदाधिकारी निवडण्याची पद्धत बंद करण्यात आली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर