अनिल देशमुखांबाबत व्हॉटसॲपवर वादग्रस्त पोस्ट; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 21:46 IST2022-03-02T21:44:53+5:302022-03-02T21:46:20+5:30
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात व्हॉटस ॲपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल नरखेड तालुक्यातील तारा येथील दीपक कठाने विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल देशमुखांबाबत व्हॉटसॲपवर वादग्रस्त पोस्ट; गुन्हा दाखल
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात व्हॉटस ॲपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल नरखेड तालुक्यातील तारा येथील दीपक कठाने विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख यांच्यासंदर्भात सामाजिक भावना दुखावणारी पोस्ट व्हॉटस ॲपवर टाकण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांनी जलालखेडा पोलीस स्टेशन येथे बुधवारी दुपारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक कठाने (३८, रा. तारा) यांच्याविरुद्ध कलम २९५ (अ), ५०५(२), ५००, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. तपास ठाणेदार मनोज चौधरी करत आहे.