नासुप्रला हवाय अंबाझरी पार्कचा कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:09+5:302021-07-17T04:08:09+5:30
नासुप्र विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. तीत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नासुप्रचे सभापती तसेच नासुप्रचे तिन्ही विश्वस्त उपस्थित हाेते. ...

नासुप्रला हवाय अंबाझरी पार्कचा कंत्राट
नासुप्र विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. तीत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नासुप्रचे सभापती तसेच नासुप्रचे तिन्ही विश्वस्त उपस्थित हाेते. राज्य शासनाकडून लीज प्राप्त करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) अंबाझरी उद्यानाच्या परिसरात व्यावसायिक पार्क निर्मितीचे कंत्राट ‘गरुडा ॲम्युझमेंट पार्क’ या कंपनीला दिले आहे. मात्र या कंपनीने झाडे ताेडण्याचा सपाटा सुरू केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडले. १९५७ पासून महापालिकेने या ऐतिहासिक उद्यानाची देखभाल केली. गेल्या काही वर्षात ८० ते ९० काेटी खर्चून विकास केला असे असताना २०१७ मध्ये कुणाच्या फायद्यासाठी हे उद्यान मनपाने महसूल विभागाला दिले ? मनपाने सभागृहात ठराव पारित केला, त्यात अटी व शर्ती टाकल्या. मात्र त्या डावलून कंपनीला कंत्राट देण्यात आले, असे आक्षेप बैठकीत नोंदविण्यात आले. अंबाझरी उद्यान लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
‘गरुडा ॲम्युझमेंट पार्क’ कंपनीवर ताशेरे
- ‘गरुडा ॲम्युझमेंट पार्क’ ही कंपनी दरवर्षी दीड काेटी याप्रमाणे ३० वर्षासाठी ४५ काेटी रुपये देणार आहे. आधीच ८०-९० काेटी खर्च केल्यानंतर पुढच्या ३० वर्षासाठी कमी पैशात जागा देण्यात औचित्य काय, हा करार करून कुणाला फायदा पाेहचविला जात आहे, कंपनीने मनपा, पर्यटन विभाग, राज्य शासन यापैकी एकाही यंत्रणेची परवानगी न घेता शेकडाे झाडे व डाॅ. आंबेडकर स्मारक कसे ताेडले, याबाबत महापालिका किंवा पर्यटन विभागाने गुन्हा दाखल का केला नाही, असे प्रश्न या बैठकीदरम्यान उपस्थित करून कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.