शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हा तर न्यायालयाचा अवमान!

By admin | Updated: January 23, 2016 03:03 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांची वेतन निश्चिती करण्यात आली नाही.

हायकोर्ट : आदेशानंतरही पुरण मेश्रामांची वेतन निश्चिती नाहीनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांची वेतन निश्चिती करण्यात आली नाही. शासनाचे हे वागणे न्यायालयाचा अवमान आहे असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगून संतप्त भावना व्यक्त केल्या.यासंदर्भात मेश्राम यांनी रिट याचिका केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शासनाकडून आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येताच न्यायालय संतप्त झाले. त्यांनी उच्च शिक्षण सहसंचालक अंजली रहाटगावकर यांना न्यायालयात उपस्थित होण्याचे निर्देश दिलेत. परंतु, रहाटगावकर बाहेरगावी असल्यामुळे न्यायालयात उपस्थित होऊ शकल्या नाहीत. अतिरिक्त सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी रहाटगावकर यांच्याची चर्चा करून मेश्राम यांच्या वेतन निश्चितीसंदर्भातील दोन वादग्रस्त पत्र मागे घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. परिणामी न्यायालयाने याचिकेवर २५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे असे शासनाला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.मेश्राम यांना वित्त व लेखाधिकारीपदी पुनर्नियुक्ती देण्यात आली होती. कुलपतींनी यावर आक्षेप घेतला होता. यामुळे मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १३ मार्च २०१५ रोजी उच्च न्यायालयाने कुलपतींच्या आदेशावर स्थगिती देऊन मेश्राम यांना ३० मे २०१४ पासून वित्त व लेखाधिकारीपदी कार्य करू देण्याचे आदेश दिले होते. तसेच, समान वेतनश्रेणी लागू करण्यास सांगितले होते. या आदेशाविरुद्ध नागपूर विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १५ मे २०१५ रोजी विद्यापीठाची याचिका खारीज केली. यानंतर २५ मे २०१५ रोजी मेश्राम यांची कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. वित्त व लेखाधिकारी आणि कुलसचिवाची वेतनश्रेणी सारखीच आहे. मेश्राम यांच्या वेतन निश्चितीचा प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक अंजली रहाटगावकर यांच्याकडे प्रलंबित होता. त्यांनी प्रस्तावावर निर्णय न घेता १७ जुलै २०१५ रोजी मेश्राम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारे पत्र पाठविले. परिणामी मेश्राम यांनी ३० आॅगस्ट २०१५ रोजी रहाटगावकर यांना अवमानना नोटीस पाठविली. त्यावर रहाटगावकर यांनी १२ सप्टेंबर २०१५ रोजी दुसरे वादग्रस्त पत्र पाठविले. आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला.तसेच, वेतन निश्चितीचा प्रस्ताव विद्यापीठाकडे परत पाठविला. आता रहाटगावकर यांनी दोन्ही वादग्रस्त पत्र मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे.मेश्राम यांची पहिल्यांदा ३० मे २००९ रोजी वित्त व लेखाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. शासनाने ३० नोव्हेंबर २०११ रोजी आदेश जारी करून त्यांना प्राध्यापकाची वेतनश्रेणी मंजूर केली होती. त्यानुसार त्यांची वेतन निश्चिती झाली होती. त्यांचा वित्त व लेखाधिकारीपदाचा कार्यकाळ २९ मे २०१४ रोजी संपला होता. यानंतर त्यांची या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्यांना आधीचीच वेतन श्रेणी देण्यास सांगितले होते. परंतु, या आदेशाचे पालन झाले नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)