शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

समांतर वीज वितरण परवान्याला ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'चा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:18 IST

Nagpur : 'एमईआरसी'ने घेतली ई-सार्वजनिक सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) टॉरेंट पॉवर लिमिटेडच्या (टीपीएल) नागपूर शहर आणि आसपासच्या भागांसाठी समांतर वीज वितरण परवान्याच्या याचिकेवर मंगळवारी ई-सार्वजनिक सुनावणी घेतली. या सुनावणीत मोठ्या संख्येने ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'ने टॉरेंट पॉवरच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध केला, तर सहा औद्योगिक संघटनांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शविला.

सुनावणीदरम्यान, टॉरेंट पॉवरने सर्व आक्षेप फेटाळून लावत स्पर्धेच्या बाजूने दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. ही सुनावणी 'एमईआरसी'चे अध्यक्ष संजय कुमार आणि सदस्य आनंद लिमये आणि सुरेंद्र बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. टॉरेंटने नागपूर जिल्ह्यासोबतच मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्यांसाठीही अशाच याचिका दाखल केल्या आहेत, ज्यांना अनेकांनी विरोध केला आहे. त्यात 'एमएसईडीसीएल'च्या विविध युनियन्सच्या प्रतिनिधींचा समावेश होता. विशेष म्हणजे, 'एमएसईडीसीएल'च्या याचिकांना नेहमीच विरोध करणारी 'प्रयास एनर्जी ग्रुप' (पीईजी) या संस्थेनेही टॉरेंटला विरोध केला. 'पीईजी'चे प्रतिनिधी शांतनू दीक्षित यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत परवाना देणे घाईचे ठरेल. त्यांनी टॉरेंटच्या याचिकेत समांतर परवान्यामुळे निर्माण होणाऱ्या काही मूलभूत आव्हानांचा पुरेसा विचार केला नसल्याचे नमूद केले. फक्त नफ्याचे ग्राहक निवडणे, नेटवर्कची नक्कल आणि वीज खरेदीच्या नियोजनातील गुंतागुंत यांसारख्या गंभीर समस्या अनुत्तरित आहेत आणि कोणत्याही परवान्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी यावर सखोल तपासणी होणे आवश्यक आहे, असे सांगत दीक्षित यांनी 'एमईआरसी'ला ही याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली.

का केला विरोध ?'एमएसईडीसीएल'नेसुद्धा या याचिकेला विरोध केला. टॉरेंटला परवाना मिळाल्यास 'एमएसईडीसीएल'ला अतिरिक्त वीज खरेदी करार आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल. टॉरेंट फक्त जास्त नफा देणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करील, ज्यामुळे निवासी आणि कृषी ग्राहकांना मिळणारी क्रॉस-सबसिडी व्यवस्था धोक्यात येईल, पायाभूत सुविधांचा गैरवापर होईल, असे 'एमएसईडीसीएल'ने सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी या प्रस्तावाला विरोध केला.

टोरेंट पॉवर उपक्रमाचे स्वागतटॉरेंट पॉवर लिमिटेडच्या (टीपीएल) नागपूरमध्ये समांतर वीज वितरण परवाना मिळवण्याच्या प्रस्तावाचे नागपूर जिल्ह्यातील सहा औद्योगिक संघटनांनी स्वागत केले आहे. उद्योगांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) झालेल्या सुनावणीत स्पर्धा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. आर.बी. गोएंका यांनी सहा औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधित्व करताना सांगितले की, वीज क्षेत्रातील 'एमएसईडीसीएल'ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी समांतर वितरण परवान्याची आवश्यकता आहे. यामुळे वीज क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. गोएंका यांनी वीज कायदा, २००३ मधील कलम १४ चा संदर्भ देत एकाच वितरण क्षेत्रात एकापेक्षा जास्त परवानाधारक असू शकतात, असे स्पष्ट केले. त्यांनी कलम १४ मधील तरतुदीनुसार, अर्जदाराने भांडवली पर्याप्तता, पतपुरवठा क्षमता आणि आचारसंहितेचे पालन केले असेल, तर आयोगाने परवाना मंजूर करावा. यापूर्वीच एका कंपनीला परवाना दिला आहे, म्हणून नव्या कंपनीला तो नाकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. गोएंका यांनी आयोगाला विनंती केली की, टॉरेंट पॉवरला परवाना तात्काळ मंजूर करावा. तांत्रिक, व्यावसायिक किंवा दराशी संबंधित इतर कोणतेही मुद्दे नंतरच्या टप्प्यात, म्हणजेच टॉरेंट पॉवरची एकूण महसूल गरज आणि दर निश्चित करताना विचारात घेतले जाऊ शकतात, असे त्यांनी सुचवले. या टप्प्यावर तांत्रिक आणि इतर समस्या उपस्थित करणे गैरलागू आहे, यावर त्यांनी भर दिला.

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज