शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्राहक मंच :  आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन पदाधिकाऱ्यांना कारावास व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:06 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांच्या अवमान प्रकरणात आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी सुनील उमरेडकर व संजय उमरेडकर यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देसुनील व संजय उमरेडकर यांना दणका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांच्या अवमान प्रकरणात आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी सुनील उमरेडकर व संजय उमरेडकर यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, तक्रारकर्त्या ग्राहकास १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कमही या पदाधिकाऱ्यांनीच द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. दत्तात्रय खिरटकर असे ग्राहकाचे नाव असून ते न्यू कैलाशनगर येथील रहिवासी आहेत. मंचने १५ एप्रिल २०१५ रोजी खिरटकर यांची तक्रार अंशत: मंजूर करून कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना विविध आदेश दिले होते. खिरटकर यांनी खरेदी केलेल्या सदनिकेचे बांधकाम करारानुसार सर्व सुविधांसह पूर्ण करण्यात यावे, त्यांच्याकडून उर्वरित ७६ हजार रुपये घेऊन त्यांना नोंदणीकृत विक्रीपत्र करून देण्यात यावे व सदनिकेचा ताबा देण्यात यावा, विक्रीपत्र करून ताबा देईपर्यंत खिरटकर यांना त्यांच्या १२ लाख २५ हजार रुपयावर १९ जुलै २०११ पासून ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे आणि त्यांना २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी या आदेशांचा त्यात समावेश होता. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या आदेशांचे पालन केले नाही. परिणामी, खिरटकर यांनी मंचमध्ये अर्ज दाखल केला होता. त्यावर मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची बाजू मांडून खिरटकर यांनी लावलेले आरोप फेटाळले होते. शेवटी मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दणका दिला.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे