शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंच : डी. एल. सव्वालाखे डेव्हलपर्सला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:31 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून डी. एल. सव्वालाखे प्रमोटर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांना दणका दिला आहे.

ठळक मुद्देतक्रारकर्त्याची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून डी. एल. सव्वालाखे प्रमोटर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांना दणका दिला आहे.मनोज मेहता असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते जुना सक्करदरा येथील रहिवासी आहेत. मेहता यांचे ७ लाख ६८ हजार १२२ रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि मेहता यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई अदा करावी, असे आदेश मंचने डेव्हलपरला दिले आहेत. संबंधित रकमेवर १८ नोव्हेंबर २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला.तक्रारीतील माहितीनुसार, मेहता यांनी डी. एल. सव्वालाखे डेव्हलपर्सच्या मौजा चुरडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथील रुचिरा योजनेतील एक सदनिका १३ लाख ५० हजार रुपयात खरेदी केली होती. त्याकरिता १३ जुलै २०१४ रोजी डेव्हलपरला ७ लाख २२ हजार १२२ रुपये दिले. त्यानंतर १९ आॅगस्ट २०१४ रोजी डेव्हलपरने विक्रीचा करारनामा करून दिला. त्यावेळी मेहता यांनी डेव्हलपरला ४६ हजार रुपये दिले. करारानुसार मार्च-२००० किंवा त्यापूर्वी सदनिकेचा ताबा द्यायचा होता. परंतु, डेव्हलपरने वेळेत सदनिकेचे बांधकाम पूर्ण केले नाही. सदनिकेची विविध कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे मेहता यांनी त्यांची रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी डेव्हलपरला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी मेहता यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. डेव्हलपर नोटीस तामील होऊनही मंचसमक्ष हजर झाले नाही. करिता, तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करण्यात आली.आरोप सिद्धडेव्हलपरने मेहता यांची पूर्ण रक्कम व्याजासह परत करणे आवश्यक आहे. डेव्हलपर मंचची नोटीस तामील होऊनही गैरहजर राहिले. त्यांनी आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे डेव्हलपरवरील आरोप सिद्ध होतात, असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे