शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

कार्बन मोबाईल्सला ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:15 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात कार्बन मोबाईल्स कंपनीला दणका दिला आहे. कंपनी व इतर प्रतिवादींनी पीडित महिला ग्राहकाला मोबाईलची किंमत व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसदोष मोबाईल विक्री : किंमत व्याजासह परत करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात कार्बन मोबाईल्स कंपनीला दणका दिला आहे. कंपनी व इतर प्रतिवादींनी पीडित महिला ग्राहकाला मोबाईलची किंमत व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला आहे.मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी प्रकरणावर निर्णय दिला. स्मिता नारनवरे असे ग्राहकाचे नाव असून, त्या गोंडवानानगर येथील रहिवासी आहेत. त्यांना सदोष मोबाईल विकण्यात आला होता. त्यानंतर कंपनीकडून आवश्यक सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. कंपनी व इतरांनी नारनवरे यांना मोबाईलचे ४ हजार ५० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावेत, असा आदेश मंचने दिला आहे. व्याज १३ आॅगस्ट २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीत लागू होणार आहे. याशिवाय नारनवरे यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी तीन हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी १५०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.नारनवरे यांनी १५ जून २०१६ रोजी सीताबर्डीतील मोबाईल व्हिल्ला येथून कार्बन कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. १० आॅगस्ट रोजी मोबाईलची बॅटरी अचानक कमी झाली. त्यानंतर मोबाईल सुरू होत नव्हता. परिणामी, त्यांनी कंपनीला मोबाईल दुरुस्त करून मागितला. मोबाईल ओम इलेक्ट्रॉनिक्सकडे दुरुस्तीकरिता पाठविण्यात आला. ओम इलेक्ट्रॉनिक्सने त्यांना मोबाईल वॉरंटी काळात बसत नसल्याचे व मोबाईल दुरुस्तीसाठी खर्च लागेल, असे सांगितले. त्यानंतर नारनवरे यांनी कंपनीकडे तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.

टॅग्स :consumerग्राहकCourtन्यायालय