शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

ग्राहक मंच : अविनाश भुते यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 8:42 PM

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका अवमानना प्रकरणामध्ये एम्परर होंडा शोरूमचे संचालक अविनाश भुते, सुनीता भुते, अंबर भुते व दिनेश आचार्य यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावून या सर्वांना येत्या २७ मार्च रोजी हजर होण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्दे२७ मार्च रोजी हजर होण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका अवमानना प्रकरणामध्ये एम्परर होंडा शोरूमचे संचालक अविनाश भुते, सुनीता भुते, अंबर भुते व दिनेश आचार्य यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावून या सर्वांना येत्या २७ मार्च रोजी हजर होण्याचा आदेश दिला.प्रकरणावर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या चौघांविरुद्ध राम प्रभाकर करू यांनी अवमानना अर्ज दाखल केला आहे. करू यांनी एम्परर होंडा शोरूममधून १२ लाख ३८ हजार रुपयांत होंडा सिटी कार खरेदी केली होती. त्या कारला जुने पार्टस् लावण्यात आले असल्याचे खरेदीच्या काही दिवसानंतर त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शोरुमकडे तक्रार करून नवीन कार देण्याची मागणी केली. परंतु, त्यांची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. २१ सप्टेंबर २०१८ रोजी मंचने ती तक्रार अंशत: मंजूर करून करू यांना नवीन कार देण्यात यावी किंवा कारचे १२ लाख ३८ हजार रुपये ९ टक्के व्याजाने परत करण्यात यावे असे आदेश शोरुम संचालकांना दिले. तसेच, करू यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी ४० हजार रुपये भरपाई मंजूर केली. या आदेशाचे पालन करण्यासाठी शोरुम संचालकांना ३० दिवसाचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर करू यांनी संचालकांना मंचच्या निर्णयाची प्रत पाठविली व मंचच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. परंतु, त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी, त्यांनी मंचमध्ये अवमानना अर्ज दाखल केला आहे. करू यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत सावजी यांनी बाजू मांडली.समन्सला प्रतिसाद नाहीयापूर्वी या चौघांना समन्स बजावून २८ फेबु्रवारी रोजी मंचासमक्ष प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सोनेगाव पोलिसांनी त्यांना समन्स तामील केला. त्यानंतरही ते मंचासमक्ष हजर झाले नाही. परिणामी, त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आला आहे. यानंतरही मंचासमक्ष हजर होणे टाळल्यास त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला जाऊ शकतो. तसे झाल्यास त्यांना अटक करून मंचासमक्ष हजर केले जाईल.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचnagpurनागपूर