शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ग्राहक आयोग : नागपूर सहारा प्राईम सिटी कंपनीला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:24 PM

सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येकी ५ लाख व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायचे आहे.

ठळक मुद्देतक्रारकर्त्यांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येकी ५ लाख व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायचे आहे.खंडपीठाचे पीठासीन सदस्य बी. ए. शेख व सदस्य जयश्री येंगल यांनी नुकताच हा निर्णय दिला. तक्रारकर्त्या ग्राहकांनी कंपनीच्या वर्धा रोडवरील गृहयोजनेतील सदनिका खरेदी केल्या आहेत. त्यांनी २००८ पासून कंपनीला २५ ते ४० लाख रुपयांपर्यंतची रक्कम अदा केली. परंतु, कंपनीने करारामध्ये निर्धारित झालेल्या कालावधीत योजना पूर्ण करून ग्राहकांना सदनिकांचा ताबा दिला नाही. योजनेतील इमारती अर्धवट बांधून पडल्या आहेत. योजनेच्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. ग्राहकांनी त्यांच्या जीवनभराची कमाई कंपनीला दिली आहे. तसेच, काही ग्राहकांनी बँकेतून कर्ज काढून सदनिकेची किंमत अदा केली आहे. योजनेचे काम रखडल्यामुळे सर्व ग्राहकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरुवातील ग्राहकांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावून योजना पूर्ण करून सदनिकांचा ताबा देण्याची मागणी केली होती. परंतु, कंपनीने त्यांना दिलासा दिला नाही. परिणामी, विजय अडतिया व इतर १६ ग्राहकांनी आयोगाचे दार ठोठावले होते. ग्राहकांतर्फे अ‍ॅड. नलिन मजिठिया व अ‍ॅड. तृप्ती महेंद्रकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर