शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक आयोग : सहाराचे सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:38 IST

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सहारा प्राईम सिटी कंपनीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय व सुशांतो रॉय यांच्याविरुद्ध १० हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावला. प्रकरणावर अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य श्रीमती यू. एस. ठाकरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देआदेशांचे पालन केले नसल्याची तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सहारा प्राईम सिटी कंपनीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय व सुशांतो रॉय यांच्याविरुद्ध १० हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावला. प्रकरणावर अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य श्रीमती यू. एस. ठाकरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.१८ सप्टेंबर २०१५ रोजी आयोगाने ग्राहक विभा मेहाडिया यांचे १२ लाख ४६ हजार ८६ रुपये १२ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला होता. तसेच, मेहाडिया यांना ३ लाख ५० हजार रुपये भरपाई मंजूर केली होती. त्या आदेशांचे पालन करण्यात आले नाही, असे मेहाडिया यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आयोगात अर्ज दाखल केला आहे. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी आवश्यक संधी मिळूनही कंपनी आयोगासमक्ष हजर झाली नाही. परिणामी, आयोगाने सुब्रतो रॉय व सुशांतो रॉय यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावला. तसेच, त्यांना येत्या ७ जून रोजी आयोगासमक्ष हजर होऊन स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. मेहाडिया यांनी सुरुवातीला सुब्रतो रॉय, सुशांतो रॉय व नागपूर येथील सहारा प्राईम प्रकल्पाचे व्यवस्थापक अनुजकुमार द्विवेदी यांना कायदेशीर नोटीस बजावून आयोगाच्या आदेशाचे पालन करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांनी नोटीसची दखल घेतली नाही. त्यामुळे मेहाडिया यांनी आयोगात अर्ज दाखल केला. मेहाडिया यांच्यातर्फे अ‍ॅड. नलीन मजिठिया यांनी कामकाज पाहिले.असे आहे मूळ प्रकरणकंपनीच्या वर्धा रोडवरील सहारा प्राईम सिटी प्रकल्पामध्ये मेहाडिया यांनी सदनिका खरेदी केली आहे. परंतु, प्रकल्प पूर्ण करून त्यांना सदनिकेचे विक्रीपत्र करून देण्यात आले नाही. तसेच, सदनिकेचा कायदेशीर ताबा देण्यात आला नाही. परिणामी, त्यांनी कंपनीला अदा केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी व भरपाईसाठी आयोगात तक्रार दाखल केली होती. १८ सप्टेंबर २०१५ रोजी आयोगाने ती तक्रार अंशत: मंजूर करून संबंधित निर्णय दिला होता. त्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी ३० दिवसाची मुदत देण्यात आली होती, पण कंपनीने निर्णयावर अंमलबजावणी केली नाही.

टॅग्स :Subroto Royसुब्रतो रॉयconsumerग्राहक