शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महामेट्रो रिच-२ च्या बांधकामाला वेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:51 IST

मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गावरील बांधकाम वेगात पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावर रिच-१ मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावर रिच-३ येथे लवकरच सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. शिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यानच्या मार्गावर कामाने वेग घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सहा स्टेशन राहणार आहेत.

ठळक मुद्दे सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक, स्टेशन, व्हाया डक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गावरील बांधकाम वेगात पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावर रिच-१ मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावर रिच-३ येथे लवकरच सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. शिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यानच्या मार्गावर कामाने वेग घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सहा स्टेशन राहणार आहेत.या मार्गावर शासकीय कार्यालय, रिझर्व्ह बँक, खासगी व शासकीय बँक, औद्योगिक वसाहत, शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहनचालकांची मोठी गर्दी दिसून येते. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर जड वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणारच आहे. या ठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. बांधकामाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या मार्गावर गड्डीगोदाम चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत मेट्रोच्या बांधकामासोबतच डबल डेकर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या पूर्णत्वानंतर या मार्गावर महत्त्वाचा बदल नागरिकांना दिसून येणार आहे. तसेच गुरुद्वाराजवळील भारतीय रेल्वेच्या पुलावर चार मजली वाहतुकीचे स्थळ बघायला मिळणार आहे. सर्वात खालच्या मजल्यावर रस्ता वाहतूक, पहिल्या मजल्यावर भारतीय रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर (डबल डेकर) राष्ट्रीय महामार्ग व चौथ्या मजल्यावर नागपूर मेट्रोची वाहतूक होणार आहे.रिच-२ बांधकामाची वैशिष्ट्ये 

  •  पायलिंग ९६ टक्के
  • पाईल कॅप ८५ टक्के
  •  पिल्लर ७६ टक्के
  •  सेगमेंट कास्टिंग ३३ टक्के
  •  मेट्रो स्टेशन ५४ टक्के
  •  गर्डर लाँचिंगचे कार्य प्रगतिपथावर
टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर