बांधकाम कंत्राटदाराची हत्या

By Admin | Updated: June 1, 2014 00:58 IST2014-06-01T00:58:37+5:302014-06-01T00:58:37+5:30

बांधकाम कंत्राटदाराची तीक्ष्ण शस्त्राने घाव घालून हत्या करण्यात आल्यामुळे बिडगाव (नंदनवन) परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. मनिराम रूपचंद नागेश्‍वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे.

Construction Contractor's Murder | बांधकाम कंत्राटदाराची हत्या

बांधकाम कंत्राटदाराची हत्या

नागपूर : बांधकाम कंत्राटदाराची तीक्ष्ण शस्त्राने घाव घालून हत्या करण्यात आल्यामुळे बिडगाव  (नंदनवन) परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. मनिराम रूपचंद नागेश्‍वर (वय ३५) असे  मृताचे नाव आहे. 
मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील मूळ निवासी असलेला मनिराम पाच वर्षांंपूर्वी रोजगाराच्या  शोधात नागपुरात आला आणि चांगला रोजगार मिळाल्याने येथेच स्थिरावला. आपल्या  परिवारासह तो       नागेश्‍वरनगरात राहात होता.
बांधकामाची छोटी-मोठी कामे तो करीत होता. सध्या त्याचे पाचपावलीतील वैशालीनगरात काम  सुरू आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता तो घरी जेवायला आला. जेवणानंतर परत कामावर गेला.
रात्री ९.१५ ला घरी परतला. पाणी पिल्यानंतर पत्नी मंजू (वय २९) हिला लवकरच परत येतो,  असे सांगून घरून निघून गेला. दीड-दोन तास झाले तरी तो परतला नाही. त्याचा मोबाईलही नो  रिप्लाय होता. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणार्‍या हेमराजला मंजूने फोन करून मनिरामबद्दल  विचारणा केली. हेमराजने माहीत नाही म्हटल्यानंतर मंजू गप्प बसली. दरम्यान, काही वेळेनंतर  हेमराज आणि हंसराज बिसेन हे दोघे मनिरामच्या घरी आले आणि मंजूच्या सांगण्यावरून ते  मनिरामचा शोध घेऊ लागले. घराजवळून काही अंतरावरच रेल्वेलाईन आहे.
 तेथे मनिरामचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे हेमराज आणि हंसराजने मंजूला  फोनवरून सांगितले. मंजू शेजार्‍यांसह घटनास्थळी पोहोचली. माहिती कळताच नंदनवन  पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी  घटनास्थळी मोठी गर्दी केली.
मनिरामच्या गळा आणि मानेवर सत्तूरसारख्या जाडसर हत्याराचे वार होते. मंजूच्या तक्रारीवरून  पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Construction Contractor's Murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.