हे तर माझ्या विरोधकांचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST2021-01-08T04:18:36+5:302021-01-08T04:18:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मी ज्या पद्धतीने राज्यात काम करतोय, त्यामुळे ओबीसींच्या माझ्याकडून फार अपेक्षा वाढल्या आहेत. माझ्याकडे ...

This is the conspiracy of my opponents | हे तर माझ्या विरोधकांचे षड्यंत्र

हे तर माझ्या विरोधकांचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मी ज्या पद्धतीने राज्यात काम करतोय, त्यामुळे ओबीसींच्या माझ्याकडून फार अपेक्षा वाढल्या आहेत. माझ्याकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत चर्चा होत आहे. अर्थात हा निर्णय हायकमांडचा आहे. परंतु मी तिथपर्यंत जाऊ नये म्हणून सुतळीचा साप करण्यात आला. मला बदनाम करण्यासाठी माझी प्रतिमा डागाळण्यासाठी हे विराेधकांचे षड्यंत्र आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

मी गेल्या २५ वर्षांपासून आमदार म्हणून काम करतोय, विविध पदांवर काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय. मला माहिती आहे कायदा काय असतो. माझ्यावर आंदोलनाच्या किरकोळ केसेस होत्या. आजच्या तारखेपर्यंत माझ्यावर कुठलीही केस नाही. एकही केस पेंडिंग नाही. मी २०१२ मध्ये पासपोर्ट काढला होता. तेव्हा एजंट माझी स्वाक्षरी घेऊन गेला होता. तेव्हा आंदोलनाच्या चार केसेस होत्या. त्यासुद्धा किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यावेळी त्या माझ्या लक्षात आल्या नव्हत्या. दरम्यान, भाजपच्या एका आमदाराने माझ्याविरोधात पीआयएल दाखल केली. मला नोटीस आली. मी नोटीसचे उत्तर दिले, की आजच्या तारखेला माझ्याकडे कुठलीही केस दाखल नाही. त्याचवेळी २१ डिसेंबर २०२० रोजी मी स्वत: ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट जमा केला. त्यांना सांगितले की, माझ्यावर सध्या कुठलीही केस नाही. तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या.. माझ्यावर कुठलीही केस नाही, याचे प्रमाणपत्र मी सादर केले. त्याची रिसिव्ह कॉपीसुद्धा माझ्याकडे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: This is the conspiracy of my opponents