शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीला संवैधानिक मूल्यापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र; मान्यवरांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 09:40 IST

नव्या पिढीला संविधानाच्या मूलतत्त्वापासून दूर करण्याचे आणि लोकशाहीचा पाया डळमळीत करण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात असल्याची टीका विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी लोकमतशी बोलताना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, संघराज्य व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व, लोकशाही आणि विविधता, नोटाबंदी आदी विषयाचे धडे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून देशभरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकशाहीपूरक संविधानवादी नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ९ वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाला कात्री लावून विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याचे कारण देत हा प्रकार करण्यात आला आहे. खरेतर हे विषय संविधानाचे मूलभूत तत्त्व आहेत आणि याच आधारावर लोकशाहीचा डोलारा उभा आहे. विद्यार्थ्यांवर या मूलतत्त्वाचा संस्कार होणे अत्यावश्यक आहे, तेव्हाच चांगले नागरिक घडण्यास मदत होईल. मात्र हे विषय वगळून नव्या पिढीला संविधानाच्या मूलतत्त्वापासून दूर करण्याचे आणि लोकशाहीचा पाया डळमळीत करण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात असल्याची टीका विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी लोकमतशी बोलताना केली आहे.भारतीय राज्यघटनेला अपेक्षित समाज घडवायचा आणि टिकवायचा असेल तर धर्मनिरपेक्षता, सजग नागरिकत्व अशा मूल्यांचा संस्कार नेहमीच आवश्यक राहणार आहे. असे विषय कसे काय वगळले जाऊ शकतात? असे काही केले जाऊ नये, हे इष्ट नाही.- श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिकएक महान देश घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनविणे हाच शिक्षणाचा उद्देश आहे. मात्र अभ्यासक्रमातील अतिशय महत्त्वाचे धडे वगळून संवैधानिक आणि नैतिक शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचेच काम सरकार करीत आहे. अशामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक नैतिकतेची जाणीव निर्माण होईल, ही अपेक्षाच बाळगता येणार नाही.- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, ज्येष्ठ विधीज्ञलोकशाही, विविधता, धर्मनिरपेक्षता, संघराज्य ही संविधानाची मूलतत्त्वे आहेत. संविधानाच्या तत्त्वाची मांडणी करणारे विषयच अभ्यासक्रमातून वगळण्यात येणे, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. लोकशाहीला बळकट करणारे हे तत्त्व नवीन पिढीत रुजू नये, हा प्रयत्न यातून होताना दिसत आहे. धर्मांध सरकारला अनुकूल असलेले विषय ठेवून सुजाण नागरिक घडविणारे तत्त्व गाळण्याचा हा प्रकार आहे. या धोरणाचा तीव्र निषेध होणे आवश्यक आहे.- डॉ. प्रदीप आगलावे, माजी विभागप्रमुख, आंबेडकर थॉट्सज्या मूलभूत तत्त्वावर संविधान उभे आहे त्यांना वगळणे म्हणजे संविधानाचा अपमान आणि लोकशाहीवरती हल्ला करण्यासारखे आहे. भारतीय लोकशाहीचा पाया, संविधानातील तत्त्व नवीन पिढीला माहीत होऊ नये म्हणून रचलेले हे कारस्थान आहे.- डॉ. बबनराव तायवाडे, माजी प्राचार्यसीबीएससीच्या पुस्तकातील नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता आणि इतर काही महत्त्वाचे विषय काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हे विषय म्हणजे संविधानाचा गाभा आहेत आणि विद्यार्थ्यांनी तेच शिकू नये असे सरकारला वाटते. विद्यमान केंद्र सरकार या विषयाबाबत प्रतिकूल भूमिका घेत आहे. संवैधानिक मूल्यांचा संस्कार तरुण पिढीवर होणे आवश्यक आहे. खरं तर संविधान हा विषयच शाळा-महाविद्यालयात, विद्यापीठात सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी अनिवार्य केला पाहिजे. मात्र तेच विषय वगळणे सर्वथा चुकीचे आहे. सरकारने हा निर्णय बदलावा, अशी आमची मागणी आहे.- ई. झेड. खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र