शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

हे तर बहुजनांमध्ये जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:56 IST

बहुजन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम काही संघटना अनेक वर्षांपासून करीत आहे. कोरेगाव भीमा येथील हल्लाही त्याच मानसिकतेतून करण्यात आलेला होता. परंतु बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजातील जागरुक नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

ठळक मुद्देसमाजात संवाद व समन्वय प्रस्थापित करणारमराठा-ओबीसी-बौद्ध संघटनांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम काही संघटना अनेक वर्षांपासून करीत आहे. कोरेगाव भीमा येथील हल्लाही त्याच मानसिकतेतून करण्यात आलेला होता. परंतु बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजातील जागरुक नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. आता २०१९ च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुजन समाजात जातीय संघर्ष पेटवून आपली राजकीय पोळी शेकण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. समाज व देशासाठी हे धोकादायक आहे, असे होऊ नये म्हणून नागपुरातील मराठा सेवा संघ, ओबीसी महासंघ आणि बुद्धिस्ट संघटनांनी बहुजन समाजामध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.भाऊसाहेब सुर्वेनगर येथील मराठा सेवा संघाचे मुख्यालय असलेल्या बळीराजा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती विषद करण्यात आली. या पत्रपरिषदेला मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव मधुकर मेहकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर असोसिएशन (बानाईचे )माजी अध्यक्ष प्रदीप नगरारे, आंबेडकरी विचारवंत अशोक गोडघाटे, प्रा. जैमिनी कडू, डॉ. कृष्णा कांबळे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जया देशमुख यांनी संबोधित केले.कोरेगाव भीमामध्ये झालेल्या घटनेनंतर बहुजन समाजाला त्यांचे शत्रू कोण आणि मित्र कोण यांची ओळख झालेली आहे. त्यामुळे बहुजन समाजामधील विविध जातींमध्ये संवाद आणि समन्वय स्थापन करण्यासाठी शहर, तालुका आणि गावांच्या पातळीवर बहुजन समाजाची समन्वय समिती स्थापन केली जाईल. आपसी विसंवादाचे मुद्दे चर्चेद्वारे सोडवण्यात येतील. बहुजन समाजामधील घटकांमध्ये सातत्याने संवाद आणि समन्वय साधला जाईल. त्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा अथवा यासारख्या आणखी घटना जर घडल्या त्यावेळी आमची समिती संवाद साधेल, शांतता प्रस्थापित करेल आणि समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या समितीमध्ये बहुजन समाजातील सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असेल. राजकीय पुढाऱ्या ला घेतले जाणार नाही. राज्यभरात प्रत्येक गावात अशी समन्वय समिती स्थापन केली जाईल.डॉ. अनिल हिरेखण, पी.एस. खोब्रागडे, प्रा. रमेश भिया राठोड, दिलीप खोडके, डॉ. त्रिलोक हजारे आदी उपस्थित होते.मनोहर भिडे व मिलिंद एकबोटेला त्वरित अटक कराकोरेगाव भीमा हल्ल्यातील मास्टरमार्इंड मनोहर ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे याला अजूनही अटक झाली नसल्याने रोष व्यक्त करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा वाद भिडे आणि एकबोटे यांनी निर्माण केला. इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये जातीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना अटक होत नाही, हे निंदनीय आहे. त्यांना त्वरित अटक व्हावी. तसेच या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात बौद्ध समाजातील आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. ते तातडीने मागे घ्यावे. त्यांची धरपकड थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावnagpurनागपूर