शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

जनतेशी नाळ जुळवून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे 'बौद्धिक'

By योगेश पांडे | Updated: December 27, 2022 11:30 IST

संघकार्य समजून घेण्यासाठी तृतीय वर्ष वर्गात भेट देण्याचे आवाहन

नागपूर : हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. राज्यातील सत्ताबदलानंतरच प्रथमच आमदार संघस्थानी येत असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करुन देण्यावरच भर राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे.

सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश होता. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली. संघातर्फे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते.

संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्हाजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे असेदेखील यावेळी श्रीधर गाडगे यांनी सांगितले. संघातर्फे दरवर्षी नागपुरात तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गाला आमदारांनी भेट द्यावी व तेथे जवळून संघकार्य व प्रशिक्षण प्रणाली जाणून घ्यावी असे आवाहनदेखील त्यांनी केले. यावेळी भाजप आमदारांना ‘भविष्यातील भारत’ या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या.

११३ आमदारांची उपस्थिती

रेशीमबागेत सर्व भाजप आमदारांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. विधानसभा व विधानपरिषद मिळून ११३ आमदारांची उपस्थिती. जे अनुपस्थित होते त्यांनी अगोदरच पक्ष पदाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती.

मंत्र्यांचा ‘दक्ष’ पवित्रा 

एरवी मंत्री तसेच नितेश राणे यांच्यासारखे सदस्य प्रसारमाध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी ‘दक्ष’ पवित्रा घेतला. येथे बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

केवळ संघाची ओळख करुन देण्यासाठी वर्ग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता हा वर्ग केवळ भाजपा आमदारांना संघाची ओळख करुन देण्यासाठी होता असे त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या या वर्गाची उत्सुकता होती, असेदेखील ते म्हणाले. स्मृती भवन परिसरात प्रत्यक्ष संघस्थानी आल्यावर समाधान वाटतंय, महान नेत्यांच्या आठवणी इथे आहेत. आमची या स्थानावर श्रद्धा आहे व मागील २५ वर्षांपासून सातत्याने आमदार हिवाळी अधिवेशन काळात येथे येतात, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीदेखील लवकरच संघस्थानी भेट देतील 

शिंदे गटातील आमदार संघस्थानी भेट देतील का याबाबत उत्सुकता होती. मात्र तेथील एकही आमदार आला नाही. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा करण्यात आली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील एकेकाळी स्वयंसेवकच होते. तेदेखील लवकरच संघस्थानी भेट देतील, असे त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूरBJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस