शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल : नारेबाजी, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:57 IST

एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणि यातच दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलामुळे नागरिक संतापले आहेत. पाण्यावरून सोमवारी काँग्रेसने महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

ठळक मुद्देमनपा मुख्यालयात फोडले मडके : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणि यातच दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलामुळे नागरिक संतापले आहेत. पाण्यावरून सोमवारी काँग्रेसने महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.गेल्या आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रासले आहेत. यातच शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात पाणी येत नाही. मात्र, अवाजवी पाण्याची देयके पाठवून नागरिकांना दुहेरी मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच मडके फोडत रोष व्यक्त केला. आयुक्तालयात नारेबाजी केली.यानंतर प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन शहरातील पाणी समस्येवर चर्चा करीत संताप व्यक्त केला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नगर अभियंता मनोज तालेवार, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ओसीडब्ल्यूचे केएनपी सिंग आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नगरसेवक व नागरिकांनी अधिकाºयांना धारेवर धरले. पाणी मागणाºयांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा निषेध नोंदविला. पाण्यासाठी आंदोलन करणाºयांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, अशी मागणी यावेळी लावून धरली. तातडीने उपाययोजना न झाल्यास कार्यालयाला टाळे लावण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.दरम्यान मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे या आंदोलनात गैरहजर असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर वनवे यांनी मात्र कौटुंबिक कारणामुळे आंदोलनस्थळी येऊ न शकल्याचे स्पष्ट केले.शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी, नगरसेवक रमेश पुणेकर, बंटी शेळके, संदीप सहारे, संजय महाकाळकर, मनोज सांगोळे, हरीश ग्वालवन्शी, नगरसेविका उज्ज्वला बनकर, हर्षला सांबळे, साक्षी राऊत, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे, माजी नगरसेवक प्रशांत धवड, रमण पैगवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग होता.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनWaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका