शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे; भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 07:10 IST

Nagpur News काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले.

ठळक मुद्देनिवडणुका तोंडावर आल्याने तथ्यहीन आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते तय्थहीन आरोप करीत आहेत. जनता कुणाला बक्षीस देईल, हे मतपेट्यातून स्पष्ट होईलच. काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले. कामाच्या मुद्यावर दोन्ही शहराध्यक्ष आमने-सामने आले असून, येत्या काळात राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. (Congress should be ready to face defeat again; BJP  reply)

गेल्या १५ वर्षांत महापालिकेत केलेल्या कामाचा हिशेब द्यावा व याच्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली होती. त्यावर दटके यांनी भाजपची बाजू मांडली. अनेक वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने शहराचा सत्यानाश केला व नागपूरला एक मोठे खेडे बनविले. भाजपने मोठ्या खेड्याला शहराचे स्वरूप दिले आहे. जनता भाजपवर खूश आहे. आज भाजपच्या काळातील रस्ते, पूल, मेट्रो बघा. नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनत असल्याचे बघून काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर येत आहेत म्हणून काहीतरी आरोप करीत सुटली आहे. राजकारणासाठी त्यांनी आरोप जरूर करावेत, मात्र अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण हे सगळे का करू शकलो नाही याचे आत्मपरीक्षणसुद्धा करावे, असे दटके म्हणाले.

अगोदर स्वत:ची गटबाजी सांभाळा

दटके यांनी गटबाजीवरून काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले. वेगवेगळे गट असलेल्या काँग्रेसने इतर पक्षांना उपदेश देऊ नये. ज्यांना अंतर्गत वादामुळे पंजा फ्रीज करावा लागला होता. ज्यांनी आपल्याच पक्षाचे बी फॉर्म दोन-तीन जणांना दिले होते. ज्यांचे नगरसेवक त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना माईक फेकून मारत आहेत, ते महापालिकेत सत्तेत येऊन काय करणार, हे जनतेला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, असे दटके म्हणाले.

काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार

भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनीदेखील काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार आहे? विकास ठाकरे स्वत: महापौर असताना त्यांनी काय दिवे लावले, महापौर म्हणून ते एक दिवसही धड सभागृह चालवू शकले नाही. अशाच नाकर्तेपणामुळे नागपूरची जनता त्यांना भविष्यातही घरीच बसविणार आहे, असे प्रतिपादन मेश्राम यांनी केले.

टॅग्स :BJPभाजपा