लस तुटवड्यवरूना काँग्रेसची निदर्शने ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:27+5:302021-04-11T04:07:27+5:30

नागपूर : केंद्र सरकारने महाराष्ट्राची लोकसंख्या व रुग्णसंख्या विचारात घेऊन लसीचा पुरवठा केला नाही. राजकीय द्वेषभावनेतून राज्याला लसीचा कमी ...

Congress protests over vaccine shortage () | लस तुटवड्यवरूना काँग्रेसची निदर्शने ()

लस तुटवड्यवरूना काँग्रेसची निदर्शने ()

नागपूर : केंद्र सरकारने महाराष्ट्राची लोकसंख्या व रुग्णसंख्या विचारात घेऊन लसीचा पुरवठा केला नाही. राजकीय द्वेषभावनेतून राज्याला लसीचा कमी पुरवठा करण्यात येत आहे, असा आरोप करीत काँग्रेसने शहरात निदर्शने करीत केंद्र सरकारचा निषेध केला.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या निर्देशानुसार शहरातील १८ ब्लॉकमध्ये निदर्शने करण्यात आली. राज्यात भाजपची सत्ता नाही. त्यामुळे केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे.? महाराष्ट्रातील लोकसंख्या 12 कोटी असून लसीच्या डोसचा पुरवठा कमी देण्यात आला. गुजरातची लोकसख्या 6 कोटी असून त्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणामध्ये लसीचा पुरवठा करण्यात आला. देशातील सर्वाधिक बाधित १० पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. असे असतानाही केंद्र सरकारने सावत्र वागणूक महाराष्ट्राला देणे योग्य नाही, अशी भूमिका आ. विकास ठाकरे यांनी मांडली.

विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात आ.अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, महासचिव डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, गिरीश पांडव, ब्लॉक अध्यक्ष पंकज थोरात, पंकज निघोट, प्रमोदसिंग ठाकूर, मोतीराम मोहाडीकर, ईर्शाद मलिक, दिनेश तराळे, प्रवीण गवरे,गोपाल पटटम, ज्ञानेश्वर ठाकरे, अब्दुल शकील राजेश पौनीकर, युवराज वैद्य, सुनिता ढोले, सुरज आवळे, देवेद्र रोटेले, विश्वेश्वर अहिरकर आदींनी भाग घेतला.

११ ते १४ एप्रिल रक्तदान शिबिर

- कोरोना संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ११ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यत प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांनी आपल्या स्तरावर रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन आ. विकास ठाकरे यांनी केले.

Web Title: Congress protests over vaccine shortage ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.