शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राखण्यासाठी काँग्रेसची कवायत

By admin | Updated: July 20, 2014 01:17 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभेत विदर्भ कायम राखण्यासाठी काँग्रेस आता ‘सिरियसली’ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन

२५ रोजी विभागीय मेळावा : मुख्यमंत्री चव्हाण, मोहन प्रकाश येणारनागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभेत विदर्भ कायम राखण्यासाठी काँग्रेस आता ‘सिरियसली’ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी विभागीय मेळावे घेतले जात असून २५जुलै रोजी मानकापूर येथे नागपूर विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा गड होता. मात्र, भाजपने विदर्भात मजबूत संघटनात्मक बांधणी केली. काँग्रेसमधील असंतुष्टांना जवळ केले आणि काँग्रेसला चांगलाच हात दाखविला. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची कर्मभूमी विदर्भ आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आपली पूर्ण ताकद विदर्भ काबीज करण्यासाठी लावणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते वेळीच सावध झाल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी राज्यभर विभागीय मेळावे घेतले जात असून नागपुरातही विदर्भ विभागीय मेळावा होत आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अ.भा. काँग्रेस समितीचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विभागातील प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कॅम्पेन कमी पडले. पदाधिकारी सक्रिय दिसले नाही. त्यामुळे या वेळी आजी- माजी खासदार, आमदार, प्रदेश व शहर पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय यांच्यासह पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुखांना सक्रिय करून जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. याशिवाय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)