शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जि.प़ गटनेत्याची निवड आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:56 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे.

ठळक मुद्देगटनेत्याच्या निवडीवरून दोन्ही पक्षात सस्पेन्स कायम : अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीबद्दल लवकरच होणार बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण होणार आहे़ काँग्रेसने सोमवारी तर राष्ट्रवादीने मंगळवारी गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे येत्या १८ जानेवारीला अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होणार आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाकडून बुधवारी संबंधित नावाचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकृतरीत्या गटनेत्याचे नाव जिल्हाधिकारी घोषित करतील़ जि.प.मध्ये काँग्रेसचे ३० उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा होत असताना आता उपाध्यक्षपदावरही काँग्रेसने दावा केल्याची माहिती आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीतून सलील देशमुख यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्याचसोबत एका सभापतीचीही राष्ट्रवादीची मागणी आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक झालेली नाही. त्यामुळे कुणाच्या काय पदरात पडणार हे अस्पष्टच आहे. जिल्हा परिषदेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेला भाजपाला यंदा विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. विरोधक म्हणून भाजपाला अनुभवी सदस्याची निवड करावी लागणार आहे. निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारापैकी अनिल निधान व व्यंकट कारेमोरे हे दोन सदस्य ज्येष्ठ आहेत. या दोघांमधून विरोधी पक्ष नेत्यापदी अनिल निधान यांचे नाव चर्चेत आहे.राष्ट्रवादीच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार 

जिल्हा परिषद व पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या सदस्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार विजय घोडमारे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, माजी सभापती सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस