शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 21:37 IST

विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.

ठळक मुद्देदिवाली मिलनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोमीलन : यापुढे एकजुटीने लढण्याच संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.आ. अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने शनिवारी रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे विधानसभेत निवडूण आलेले, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा सत्कार आणि दिवाली मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल देशमुख, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिलाह अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण होते. पुन्हा पाणिपत होईल, असेच सर्वांना वाटत होते. परंतु ज्या पद्धतीने नागपुरात काँग्रेस आघाडीचे चार आमजदार निवडून आले, त्यामुळे दोन्ही काँग्रेमध्ये नवचैतन्य संचारले आहे. आपल्या भाषणात नेत्यांनी शरद पवार यांना विजयाचे श्रेय देत यापुढे सर्व जण बेकीने नव्हे तर एकीने लढ,असा संकल्प केला. याची सुरुवात सुरुवातीलाच अनिल देशमुख यांच्या पुढकाराने झाली. त्यांनी विलास मुत्तेमवार यांचे स्वागत सतीश चतुर्वेदी यांच्याकडून तर चतुर्वेदी यांचे स्वागत मुत्तेमवार यांच्या हस्ते करून घेतले. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.यावेळी विकास ठाकरे, नितीन राऊत, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे, बंटीस शेळके, अनिल देशमुख, राजू पारवे, सुरेश भोयर, विजय घोडमारे यांचा सत्कार करण्यात आला. दोन उमेदवार वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस