शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

काँग्रेस-राष्ट्रवादी वाद वाढला, नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 13:16 IST

राष्ट्रवादीने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी  केला. त्यावर अजित पवारांनी पटोलेंना उत्तर दिले. यानंतर, पटोलंनी पुन्हा यावर भाष्य केले आहे.

नागपूर : गोंदिया-भंडारातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाचे बाण मारणे सुरुच आहे. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. त्यावर अजित पवारांनी पटोलेंना उत्तर दिले. यानंतर, पटोलंनी पुन्हा यावर भाष्य केले आहे. भाजपला थोपण्यासाठी काँग्रेससोबत आलेली राष्ट्रवादी भाजपला मदत करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला पडद्यामागून मदत करण्याचं राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं आता त्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील व येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असं पटोले म्हणाले.

नुकतेच काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर उदयपूरमध्ये पार पडले. यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह देशाच्या सीमासुरक्षा बाबतीतही चर्चा झाली. काँग्रेसला देशाची चिंता आहे सध्या देशात राज्यघटना व लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. यासह  'एक कुटुंब-एक तिकीट' हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. हाच नियम आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये लागू करण्यात येईल, असं पटोले यांनी सांगितलं. 

जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी

अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, नाना पटोले लोकांसाठी जगणारा कार्यकर्ता असून माझा इतिहास सर्वांना माहित आहे. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी, असे प्रत्युत्तर पटोलेंनी दिले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी