शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाळू धानोरकर अनंतात विलीन, वरोरा येथे अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:05 IST

अखेरच्या निरोपासाठी हजारो कार्यकर्ते जमले : धानोरकर कुटुंबीयांचं पटोलेंकडून सांत्वन

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज (दि. ३१) वरोरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेससह इतर पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. धानोरकर यांचे मंगळवारी (दि. ३० मे) पहाटे ३:३० वाजता दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. 

अत्यंत जड अंत:करणाने कार्यकर्ते व जनतेने त्यांना अखेरचा निरोप दिला. काल (दि. ३०) दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा शोक अनावर झाला. रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी येणाऱ्यांची रिघ लागली होती. लोकसेवेचे राजकारण करत असताना त्यांनी तरुणाईला आपलेसे केल्याने अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. 

धानोरकर यांना किडनी विकारावरील उपचारासाठी बुधवारी (दि. २४) नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले होते. त्याचदरम्यान वडील नारायण धानोरकर यांच्यावरही नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, शनिवारी (दि. २७) त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाही. त्यानंतर रविवारी (दि. २८) अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, मानस आणि पार्थ ही दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. 

यांची उपस्थिती -

धानोरकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

टॅग्स :Suresh Dhanorkarसुरेश धानोरकरDeathमृत्यूcongressकाँग्रेसchandrapur-acचंद्रपूर