शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

काँग्रेस वाढली, भाजप फुटली अन् सेना घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:59 IST

पारशिवनी नगर पंचायतचा निकाल लागल्यानंतर त्यावर आता विचारमंथन सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता पारशिवनीत शिवसेनेला खूप मोठा फटका बसला. दुसरीकडे काँग्रेसची मते वाढल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे, पारशिवनीत गटातटाचे राजकारण होऊनही काँग्रेसला मिळालेली ही मते समाधानकारक आहेत. भाजपचा विचार करता सर्व उमेदवारांना मिळालेली मते ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली असती तर नगराध्यक्षही त्यांचा असता. परंतु मते फुटल्याने भाजपला फटका बसला.

ठळक मुद्देपारशिवनीच्या निकालाचा सार : विधानसभेची गोळाबेरीज सुरू

गणेश खवसेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारशिवनी नगर पंचायतचा निकाल लागल्यानंतर त्यावर आता विचारमंथन सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता पारशिवनीत शिवसेनेला खूप मोठा फटका बसला. दुसरीकडे काँग्रेसची मते वाढल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे, पारशिवनीत गटातटाचे राजकारण होऊनही काँग्रेसला मिळालेली ही मते समाधानकारक आहेत. भाजपचा विचार करता सर्व उमेदवारांना मिळालेली मते ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली असती तर नगराध्यक्षही त्यांचा असता. परंतु मते फुटल्याने भाजपला फटका बसला.रामटेक विधानसभा मतदारसंघांतर्गत पारशिवनीचा समावेश होतो. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पारशिवनी शहरातील सर्व बूथवर शिवसेनेला ३,२४६ मते मिळाली होती. काँग्रेसला शहरातून ११४५ मते तर भाजपला ५८९ मते मिळाली होती. नगर पंचायतच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता या मतांमध्ये खूप मोठा फरक पडलेला दिसून येतो. शिवसेनेची तब्बल ८०६ मते घटून ती २,४४० पर्यंत खाली आली. काँग्रेसची मते ही १०८४ ने वाढून २,२२९ वर पोहोचली. तर भाजपलाही पारशिवनीत ‘अच्छे दिन’ येत ५८९ मध्ये ११९६ ची भर पडून १७८५ मतांपर्यंत पोहोचता आले.शिवसेनेचा गड राखण्यात पारशिवनीचा महत्त्वपूर्ण हातभार असायचा. मात्र या नगर पंचायतच्या निवडणुकीत शिवसेनेची मते खाली घसरल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतील चित्राबाबत शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच काय तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला २,४४० मते मिळालेली असताना वॉर्डांमधील सर्व उमेदवारांना एकूण २,०२७ मते मिळाली. ४१३ मते शिवसेनेची फुटली. नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. याशिवाय नऊ वॉर्डांमध्ये आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने दुसरे स्थान कायम ठेवले. शिवसेनेचे चार उमेदवार निवडून आले असले तरी, एकूण सहा वॉर्डांमध्ये दुसºया स्थानापर्यंत झेप घेता आली. काँग्रेसच्या तुलनेत शिवसेना उमेदवार हे अर्ध्यावरच पोहोचले.भाजपला वॉर्डांमध्ये फटकापारशिवनी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला २,२४०, काँग्रेसच्या उमेदवाराला २,२२९ तर भाजपच्या उमदेवाराला १७८५ मते मिळाली. एकूण १७ वॉर्डांमधील भाजपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या ही २,४८६ आहे. हीच मते भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली असती तर आज पारशिवनीत भाजपचा नगराध्यक्ष असता. मात्र वॉर्डांमध्ये भाजपला फटका बसला. तब्बल ७०१ मते नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला कमी मिळाली. काँग्रेसचा विचार केल्यास १६ वॉर्डांमध्येच काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यांना १८८२ मते मिळाली. त्यापेक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ३४७ मते ही अतिरिक्त मिळाली. याचा दुसºया बाजूने विचार केल्यास भाजपची मते फुटून ती काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारण