शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"काँग्रेसचा उन्माद विधानसभा निवडणुकीत उतरविणार, नागपूर ग्रामीणमध्ये सहाही जागा जिंकणार", खा. अनिल बोंडे यांचा दावा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 23, 2024 19:55 IST

Anil Bonde News: लोकसभेच्या काही जागा थोड्याशा फरकाने जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उन्माद आला आहे. त्याचा प्रत्यय देशातील जनतेला नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून, खा. बळवंत वानखेडे यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडून आणि खा. प्रतिभा धानोरकर यांनी शिव्यांची लाखोटी वाहून आला आहे.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - लोकसभेच्या काही जागा थोड्याशा फरकाने जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उन्माद आला आहे. त्याचा प्रत्यय देशातील जनतेला नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून, खा. बळवंत वानखेडे यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडून आणि खा. प्रतिभा धानोरकर यांनी शिव्यांची लाखोटी वाहून आला आहे. काँग्रेसचा हा उन्माद विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळवून नक्कीच उतरवू, असा विश्वास खा. अनिल बोंडे यांनी येथे व्यक्त केला. 

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर कार्यालयात रविवारी नागपूर ग्रामीणमधील १५० कार्यकर्त्यांना बैठकीत खा. अनिल बोंडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते. खा. अनिल बोंडे म्हणाले, राखीव मतदारसंघातून निवडून आलेले बळवंत वानखेडे यांना यशोमती ठाकूर यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडताना हाताने फिरविले आणि त्यांना  अपमानास्पद वागणूक दिली. ही खोली रा.सु. गवई यांच्या निधीतून उभारण्यात आली आहे. खा. आनंदराव अडसूळ यांचे कार्यालय होते. सन २०२२ रोजी मी राज्यसभेवर गेल्यानंतर या खोलीत माझे आणि खा. नवनीत राणा यांचे कार्यकर्ते बसायचे. त्यानंतर त्या खोलीला कुलूप लावण्यात आले. पण बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट न पाहता थेट सरकारी मालमत्तेचे कुलूपच तोडले. काँग्रेसचा हा उन्माद आता सहन करणार नाही, असा इशारा खा. बोंडे यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५० नवीन मतदार वाढविणार आहे. २३ जून ते ६ जुलैपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान पंधरवडा आणि यादरम्यान अनेक उपक्रम व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कापूस व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ हजार कोटींची मदत दिली. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करणार असल्याचे खा. बोंडे म्हणाले. 

विधानसभेच्या सहाही जागा जिंकू - सुधाकर कोहळेसुधाकर कोहळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जागतिक संघटनांनी एकत्रित येऊन सोशल मीडियातून संविधान धोक्यात असल्याचे सांगून जनतेत संभ्रम पसरविला. रामटेक लोकसभा मतदारसंघात बहुतांश क्षेत्रात भाजपा पुढे आहे. आता नागपूर ग्रामीण मतदार संघाच्या सहाही जागा मोठ्या फरकाने जिंकू.  कोहळे म्हणाले, वेळेवर उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही. परंतु पंतप्रधान मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या. संभ्रम दूर केला. शिवसेनेच्या उमेदवाराला ५.३३ लाख मते मिळाली. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे म्हणून १५०० मतदार असलेल्या बूथचे विभाजन, प्रत्येक बूथवर ५० नवीन मतदार करू आणि चूका सुधारू. आता विधानसभानिहाय जाऊन जनजागृती करणार आहे. भाजपा जिंकल्यानंतर उन्माद करीत नाही आणि हरल्यानंतर निराश होत नाही, असे कोहळे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत माजी आ. मल्ल्किार्जुन रेड्डी, अशोक धोटे, राजू पोतदार, अरविंद गजभिये, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, उदयसिंग यादव, संध्या गोतमारे आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBJPभाजपाcongressकाँग्रेस