देवलापारमध्ये काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:57+5:302021-02-13T04:09:57+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यातील देवलापार ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉँग्रेसच्या शाहिस्ता पठाण यांची बिनविरोध निवड झाली. तब्बल पन्नास वर्षांनंतर येथे अल्पसंख्याक ...

देवलापारमध्ये काँग्रेसचा झेंडा
रामटेक : रामटेक तालुक्यातील देवलापार ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉँग्रेसच्या शाहिस्ता पठाण यांची बिनविरोध निवड झाली. तब्बल पन्नास वर्षांनंतर येथे अल्पसंख्याक समाजाला शाहिस्ताच्या रुपाने संधी मिळाल्याने समाजात आनंदाचे वातावरण आहे. येथे उपसरपंचपदी विनोद मसराम यांची निवड झाली.
१ जानेवारी १९५७ मध्ये देवलापार ग्रामपंचायतची स्थापना झाली होती. त्यावेळी गावाचे पहिले सरपंच होण्याचा मान हा छगनलाल गुप्ता यांना मिळाला होता. जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत येथे काँग्रेसने १३ पैकी ११ जागेवर एकतर्फी विजय मिळविला होता. सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणुकीच्या आधी काढण्यात आले होते. परंतु शासनाने ते रद्द करुन निवडणूक झाल्यावर आरक्षण जाहीर केले. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण जाहीर झाल्याने विजयी झालेल्या सर्वच महिला सदस्यांच्या आशा वाढल्या होत्या. येथे शाहिस्ता पठाण व प्रणाली सरोदे यांच्यात सरपंच पदासाठी अखेरपर्यंत चुरस राहिली. प्रणाली सरोदे या निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्या होत्या व शाहिस्ता पठाण या मूळच्या काँग्रेसी असल्याने सरपंचपदी त्यांची वर्णी लागली.