शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलवर काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:14 IST

शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्यांकडे वेधले लक्ष : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याकडे शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सोपविले.बसस्थानकाजवळून हा विराट मोर्चा निघाला. त्यात रामटेकसह पारशिवनी व मौदा तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महिलांची लक्षणीय संख्या होती. रामटेक-पारशिवनी तालुक्यातील मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्याचे खोलीकरण व दुरुस्ती करून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय करावी, पेंच प्रकल्पाच्या पाण्याची रबी पिकासाठी व्यवस्था करण्यात यावी, शिवनी भोंडकी येथील तलावातून लिफ्ट इरिगेशनची सोय व्हावी यासाठी पाईपची दुरुस्ती करावी, रामटेक-पारशिवनी परिसरात नदीनाल्यावरील रेतीघाटांचे लिलाव करावे, आदिवासी भागातील महिला मजुरांना ने-आण करण्यासाठी जीप-कमांडरसारख्या वाहनांचा उपयोग केला जातो; अशा वाहनांवर कारवाई करू नये, तालुक्यात आधार कार्ड सेंटरची संख्या वाढवावी, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्या, देवलापारला तहसील कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा, सिंगोरी कोल प्रोजेक्टबाधितांना रोजगार द्यावा, सिंगोरी पाण्याची व्यवस्था करावी, प्रोजेक्टमुळे बंद झालेल्या रस्त्यांऐवजी डोरली-साहोली व डोरली-सोनेगाव-पारशिवनी असे रस्ते तयार करावे, नगरधन गावाकरिता बायपास रस्ता तयार करावा, नगरधनच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करावे, नगरधनमध्ये कालिदास महोत्सव दरवर्षी घेण्यात यावा, सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, हमलापुरी फाटा येथील वनविभागाच्या जागेत क्रीडांगण तयार करावे, किल्ला परिसरात कालिदासांचा पुतळा उभारावा, बोरी ते शिरपूर पांदण रस्त्याचे तसेच बोरी ते खात रस्त्याचे डांबरीकरण करावे, बोरी येथे प्रवासी निवाराकरिता बांधकाम करावे, सिंचन विहिरीकरिता ५०० फूट अंतराची अट रद्द करावी, पेंचचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, केशवराजा देवस्थानला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा देण्यात यावा, गरिबांना रेशन कार्डवर धान्य द्यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.रामटेकमधील समस्या सोडवारामटेक नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीतील विविध मागण्यांकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. पाणीसमस्या दूर करून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, आदिवासी घरकुल योजना राबवावी, रखडलेला स्विमिंग पूल सुरू करावा, राखी तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मालमत्ता कर कमी करावा, कालिदास स्मारक परिसरात विद्युत व्यवस्था करावी, राजकमल रिसॉर्ट परिसरात स्वच्छता करावी, गडमंदिरावर यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रामटेक शहराकरिता मत्स्य केंद्र सुरू करावे, मृगविहारजवळील यात्री माहिती केंद्र सुरू करावे, महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कमी व्याजदराज कर्ज उपलब्ध करावे, रामटेक बायपाससह बसस्थानक, मुरमुरा भट्टी ते किटस् या मार्गावर पथदिवे लावावे, मालकी हक्काचे पट्टे त्वरित वाटप करावे, ७२ घरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे वाटप करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.रामटेकसह मौदा पारशिवनीतील हजारो लोकांचा सहभागया हल्लाबोल मोर्चात डॉ. अमोल देशमुख यांच्यासह डॉ. सुचिका देशमुख, शिशुपाल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, मोहन यादव, कैलास राऊत, देवाजी कुंभरे, माजी सभापती अनिता भड, रामटेकच्या माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, महेंद्र टक्कामोरे, गजानन भेदे, मधुकर बेले, रंजना कोल्हे, शुभांगी रामेलवार, नदिम जामा, रोशन मेश्राम, नौशाद शेख, दुर्गा लोंढे, इजराईल शेख, चाँदभाई, गंगाधर काकडे, रमेश गोमकाळे, मोरेश्वर फुलबांधे, नलिनी फुलबांधे, नरेश ढोणे, शैलेश शिंदेकर, सलीम बाघाडे, कुणाल मेश्राम, रमेश कडू, विजय ठाकरे, भावना मडावी, पुष्पा बर्वे, कमरुन्निसा शेख, कौशल्या बघेले, वनिता मेश्राम, डोमाजी चकोले, प्रमोद बरबटे, शेषराव देशमुख, पुरुषोत्तम धोटे, सदाशिव बर्वे, रवी चवरे, पिंटू वरखडे, संगीता वांढरे, डुमण चकोले, धनराज पालीवाल, भारत देशमुख, भगवान राऊत, नाना बावणे, सुभाष ढगे, अनिल भोरसले, अनिल निंबाळकर, संजय उईके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर