शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आक्रमक, सरकारच्या पुतळ्याला फासला चिखल, व्हेरायटी चौकात रस्ता रोको

By कमलेश वानखेडे | Updated: June 21, 2024 15:11 IST

राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेस समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्हेरायटी चौकात चिखलफेक आंदोलन करीत राज्य सरकारच्या पुतळ्याला चिखल फासला

नागपूर : राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेस समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्हेरायटी चौकात चिखलफेक आंदोलन करीत राज्य सरकारच्या पुतळ्याला चिखल फासला. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पोलिसांनी लावलेले बॅरीकेट ढकलून चौकाच्या मध्ये येत रस्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते व पोलिसांमध्ये ओढाताण झाली.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमले. गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, कमलेश समर्थ, मनोज सांगोळे, रोहीत यादव, नंदा पराते, नॅश अली यांच्यासह कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. आ. विकास ठाकरे म्हणाले, राज्य सरकार जनविरोधी निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले जात आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. या सर्व अनागोंदी कारभाराच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रम झाले असून सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करीत आहेत. यानंतरही सरकारने आपली जनविरोधी धोरणे बदलली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा आ. ठाकरे यांनी दिला.

यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल फासला. पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांकडून पुतळा ताब्यात घेतला. संतप्त कार्यकर्ते बॅरीकेट ढकलून देत चौकाच्या मधोमध आले व घोषणाबाजी करीत ठाण मांडले. कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केल्यामुळे चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये ओढाताण झाली.

काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई का नाही ?

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांच्या विरोधात कुठलिही कारवाई झाली नाही. आम्हीही भाजप नेत्यांच्या घरावर मोर्चे काढू शकलो असतो. पण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असतानाही पोलिसांनी आम्हाला बॅरीकेटच्या मागे ढकलले. पोलिसांनी असा भेदभाव करू नये, अशी नाराजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस