शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

मालमत्ता कर वाढीच्या विरोधात नागपूर मनपा कार्यालयापुढे काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:10 IST

मालमत्ताधारकांना पाठविण्यात आलेल्या अव्वाच्यासव्वा डिमांड रद्द करून सुधारित डिमांड पाठविण्यात याव्या यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून जोरदार नारेबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देकर कमी करून सायबरटेकचा कंत्राट रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील मालमत्तांचा सर्वे करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक कंपनीने चुकीचे व नियबाह्य सर्वेक्षण केले आहे. आजवर १२०० रुपये मालमत्ता कर भरणाऱ्यांना ३२ हजारांच्या डिमांड पाठविल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकू न त्यांना वेठिस धरणाऱ्या सायबरटेक कंपनीचा कंत्राट रद्द करावा. मालमत्ताधारकांना पाठविण्यात आलेल्या अव्वाच्यासव्वा डिमांड रद्द करून सुधारित डिमांड पाठविण्यात याव्या. यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून जोरदार नारेबाजी करण्यात आली.सायबरटेक कंपनीला इतर जिल्ह्यात काळ्या यादीत टाकण्यात आलेले आहे. असे असतानाही नागपूर महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले. या कंपनीवर महापालिकेची कृपादृष्टी कशासाठी असा सवाल आंदोलकांनी केला. कंपनीने सर्वेक्षण करताना मालमत्ताधारकांना सूचना दिलेली नाही. तसेच कर व कर आकारणी विभागाने पुनर्मूल्यांकणानंतर नागरिकांना आक्षेप नोंदविण्यासाठी नोटीस न देता थेट डिमांड पाठविल्या आहेत. नियमानुसार कर आकारणी करण्यात आलेली नाही. चुकीचे सर्वेक्षण करून १ हजार रुपये कर भरणाऱ्यांना १५ ते १८ हजारांच्या डिमांड पाठविलेल्या आहेत. अशा चुकीच्या डिमांड रद्द करून सुधारित डिमांड पाठविण्यात याव्या. सभागृहाच्या निर्णयानुसार दुपटीपेक्षा अधिक कर आकारला जाणार नाही. असे निर्देश कर व कर आकारणी विभागाला देण्यात यावे. सायबरटेक कंपनीला यापुढे सर्वेक्षणाचे बील देण्यात येऊ नये. अशी मागणी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अपर आयुक्त रविंद्र कुंभारे यांच्याकडे केली.करारानुसार सर्वेक्षणात एक घर एक युनीट गृहीत न धरता एका घराचे अनेक युनीट दर्शविण्यात आले आहे. भाडेकरू नसतानाही भाडेकरू दर्शविल्याने करामध्ये प्रचंड वाढ झाल्याने विकास ठाकरे यांनी निदर्शनास आणले. जुन्या इमारतीवर व बांधकामात बदल झालेला नसेल तर दुपटीपेक्षा अधिक कर आकारला जाणार नाही. मिळालेल्या डिमांड चुकीच्या असेल तर त्यावर आक्षेप नोंदविल्यास कर कमी केला जाईल. अशी ग्वाही कुंभारे यांनी शिष्टमंडळाला दिली.आंदोलनात अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, नगरसेव संदीप सहारे, हरीष ग्वालबंशी, रमेश पुणेकर, भावना लोणारे, प्रशांत धवड, गुड्डू तिवारी, जयंत लुटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :agitationआंदोलन