गुलाबपुष्प देऊन पेट्राेल दरवाढीचे अभिनंदन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST2021-02-17T04:13:28+5:302021-02-17T04:13:28+5:30
नागपूर : पेट्राेल, डिझेल व घरगुती गॅसच्या भाववाढीविराेधात शहर युवक काॅंग्रेसतर्फे भगवाघर चाैकात अनाेखे आंदाेलन केले. शहर उपाध्यक्ष वसीम ...

गुलाबपुष्प देऊन पेट्राेल दरवाढीचे अभिनंदन ()
नागपूर : पेट्राेल, डिझेल व घरगुती गॅसच्या भाववाढीविराेधात शहर युवक काॅंग्रेसतर्फे भगवाघर चाैकात अनाेखे आंदाेलन केले. शहर उपाध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पेट्राेल पंपावर गुलाबाचे पुष्प देऊन पेट्राेलचे भाव १०० रुपये पार जात असल्याबद्दल पेट्राेल भरायला आलेल्या नागरिकांचे अभिनंदन केले. यादरम्यान केंद्र सरकारच्या अपयशाचे शतक पार, असा आराेप करीत कार्यकर्त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
वसीम खान म्हणाले, पेट्राेल व डिझेलच्या किमतीत दरराेज वाढ हाेत आहे. केंद्रात असलेल्या शासनाने माेठमाेठी आश्वासने दिली हाेती. नरेंद्र माेदी यांनी तर मनाेरम घाेषणांचा पाऊस पाडला हाेता. विशेष म्हणजे युपीए सरकारच्या काळात पेट्राेलचे भाव वाढल्यानंतर अमिताभ बच्चनपासून अक्षय कुमार व अनुपम खेरसारख्या अभिनेत्यांनी गहजब केला हाेता. आता हेच सेलिब्रिटी भाजपा सरकारच्या समर्थनार्थ अभियान चालवित आहेत. युपीएच्या काळापेक्षा कितीतरी अधिक दरवाढ झाल्याचेही यांना काही वाटत नाही. सामान्य जनतेला मात्र महागाईच्या झळा साेसाव्या लागत असल्याचा आराेप आंदाेलकांनी केला.
आंदाेलनात रवी गाडगे पाटील, गोपाल पट्टम, मंजूर अंसारी, पवन चांदपूरकर, फिरोज खान आदी उपस्थित हाेते.