शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Winter Session Maharashtra : सीमावादाचा ठराव मांडल्याबद्दल सरकारचं अभिनंदन, कर्नाटककडून होणारा अत्याचार थांबवा : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:09 IST

गेल्या काही दिवसापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनात या संदर्भात एक एक ठराव संमत केला आहे, महाराष्ट्र सरकारनेही आज कर्नाटक विरोधी ठराव एकमताने संमत केला.

गेल्या काही दिवसापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनात या संदर्भात एक एक ठराव संमत केला आहे, महाराष्ट्र सरकारनेही आज कर्नाटक विरोधी ठराव एकमताने संमत केला, यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. 

  मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचारावर काय करणार आहोत, हा मुद्दा अजुनही अनुत्तरीत आहे. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र भूभाग आहे तो भाग केंद्रशासीत करण्याची आमची मागणी आहे. अत्यंत आक्रमकपणाणे कर्नाटक सरकार पाऊलं टाकत आहे, पण महाराष्ट्र सरकार कोणतही पाऊलं टाकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

मराठी ठसा पुसला जाऊ नये म्हणून पूर्नेविचार याचिका महाराष्ट्र सरकारने दाखल केली पाहिजे. कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये भाषिक अत्याचार सुरू केले आहेत, यावर महाराष्ट्र सरकारने काम केले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र सरकारने सध्या तिथल्या लोकांसाठी योजना लागू केल्या आहेत, पण या योजना तिथल्या लोकांना लागू होणार का याची माहिती घेतली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

आम्ही आज केलेल्या ठरावाला पूर्णपणे संमत केले आहे. आता पुढ काय करायचे आहे यासाठी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, कर्नाटक सरकारला आपण समज दिली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

आज अधिवेशनात सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. ज्यांनी सीमाप्रश्नी बलिदान दिले त्यांना हुतात्म म्हणून घोषित केले आहे. सध्या १३ लाभार्थी लाभ घेत आहेत. बेळगाव, कारवार, बिदर येथील मराठी लोकांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहे. या नागरिकांना फक्त १५ वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला द्यायचा आहे. तसेच शिक्षमासाठीही त्यांना सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे